What Harbhajan Singh said about Shubman Gill as Test captain : आगामी इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयने १८ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या संघाचे नेतृत्व शुभमन गिल याच्याकडे सोपवण्यात आले आहे, तर ऋषभ पंत याला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय, आठ वर्षांनंतर करुण नायर याचे कसोटी संघात पुनरागमन झाले आहे, तर साई सुदर्शन आणि अर्शदीप सिंग यांना प्रथमच कसोटी संघात स्थान मिळाले आहे.