हरभजन सिंग, गीता बसराला कोरोनाची लागण

Harbhajan Singh wife Geeta Basra test corona positive
Harbhajan Singh wife Geeta Basra test corona positiveesakal

भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) आणि त्याची पत्नी अभिनेत्री गीता बसरा (Geeta Basra) या दोघांनाही कोरोनाची लागण (Corona Positive) झाली आहे. याबाबतची माहिती या दोघांनीही आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली. हरभजनने आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना लवकरात लवकर टेस्ट करुन घेण्याचा सल्ला दिला आहे. तर गीता बसरा कोरोनाची लागण झाल्यानंतर थोडीशी नाराज असल्याचे तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरुन दिसून येते. (Harbhajan Singh wife Geeta Basra tested corona positive)

Harbhajan Singh wife Geeta Basra test corona positive
LCL : मिसबाहच्या एशियन लायन्सला 'पठाणी' दणका

हरभजन सिंगने कोरोनाची लागण झाल्यावर ट्विट केले की, 'मला कोरोनाची लागण झाली आहे. मला सौम्य लक्षणे आहेत. मी घरीच विलगीकरणात आहे. मी योग्य ती काळजी घेत आहे. मी जे कोणी माझ्या संपर्कात आले आहे त्यांना विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर चाचणी करुन घ्यावी. सुरक्षित रहा काळजी घ्या.'

Harbhajan Singh wife Geeta Basra test corona positive
पहिल्या वनडेत भारतीय संघात दुफळी, माजी पाक खेळाडूचा दावा

दुसरीकडे गीता बसराने 'मी गेल्या दोन वर्षापासून खूप काळजी घेत होते. मी दोन वर्षे कोरोनाला हुलकावणी दिली. मात्र अखेर कोरोनाने मला गाठलेच.' अशी इन्स्टा स्टोरी (Geeta Basra Instagram Stories) ठेवली आहे. भारतात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून अनेक सेलिब्रेटी नेते मंडळींनाही कोरोनाची लागण होत आहे. अनेक राज्यात कोरोनाच्या वाढच्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवीर अनेक निर्बंधही लावण्यात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com