Video : हार्दिकने रोहितला दिली शिवी, काय आहे सत्य? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

hardik pandya abuse rohit sharma eng vs ind 2nd t20

Video : हार्दिकने रोहितला दिली शिवी, काय आहे सत्य?

Hardik Pandya Abuse Rohit Sharma: इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने शानदार कामगिरी केली होती, मात्र दुसऱ्या टी-20 सामन्यात त्याची कामगिरी काही खास नव्हती. शनिवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात तो फ्लॉप ठरला. लाइव्ह मॅचदरम्यान तो सहकारी खेळाडूला शिवीगाळ करताना दिसला. सोशल मीडियावर त्याचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. (hardik pandya abuse rohit sharma eng vs ind 2nd t20)

हेही वाचा: Video: ऋषभ पंत अखेर चमकला, ICC च्या यादीत झळकला

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यासाठी शनिवारी खेळलेला टी-20 सामना काही खास गेला नाही. त्याला ना धावा करता आल्या ना विकेट घेता आल्या. पहिल्या टी-20 सामन्यात फलंदाजी करताना त्याने 51 धावा केल्या आणि 4 विकेट्सही घेतल्या. मात्र दुसऱ्या सामन्यात त्यांना विशेष काही करता आले नाही. त्यामुळ सहकारी खेळाडूला शिवीगाळ करताना दिसला.

हेही वाचा: 'आझादीचा अमृत महोत्सव' सरकारकडून इतर देशांशी सामने खेळवण्यासाठी BCCI ला प्रस्ताव

सामन्यादरम्यान टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या पहिल्याच षटकात 8 धावा देत. यानंतर तो स्टंप माइकवर सहकारी खेळाडूला शिव्या देताना दिसला. यासोबतच तो आपल्या पार्टनरला ऑन एअर शिवीगाळ करताना दिसला. शिवीगाळ करत हार्दिक पांड्या म्हणाला की, मी जेव्हा गोलंदाजी करतो तेव्हा माझ्याकडे बघ, तो काय बोलतो याची पर्वा करू नको. मात्र पांड्याने हा शब्द कोणत्या खेळाडूवर वापरला आहे, हे अद्याप कळू शकलेले नाही.

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, टीम इंडियाने दुसऱ्या टी-20 सामन्यात प्रथम फलंदाजी केली. रोहित शर्मा - ऋषभ पंतने जबरदस्त सुरुवात दिली. मात्र दोघेही बाद होताच भारताचा डाव डगमगला. विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक यांना कोणतीही मोठी कामगिरी करता आली नाही. प्रथम फलंदाजी करताना भारताने 170 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लिश संघ अवघ्या 121 धावांवर ऑलआऊट झाला. भारताने मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.

Web Title: Hardik Pandya Abuse Rohit Sharma Eng Vs Ind 2nd T20 Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top