Rishabh Pant Video : ऋषभ पंत अखेर चमकला, ICC च्या यादीत झळकला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ICC T20 World Cup promo welcome Rishabh Pant

Video: ऋषभ पंत अखेर चमकला, ICC च्या यादीत झळकला

ICC T20 World Cup promo: T20 विश्वचषकला आता जास्त वेळ उरलेला नाही, अशा स्थितीत ICC ने आता त्याचा जाहिरात सुरु केला आहे. आयसीसी सतत कोणत्या ना कोणत्या खेळाडूचा व्हिडिओ शेअर करत आहे. . ICC ने ऋषभ पंतचा एक शक्तिशाली व्हिडिओ शेअर केला आहे, त्यामुळे तो आता चर्चेत आला आहे.

भारताच्या ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकण्यात ऋषभ पंतचा मोठा वाटा आहे. यामुळेच पंत ऑस्ट्रेलियात खूप प्रसिद्ध झाला आहे, आणि यावेळी टी-20 विश्वचषकही ऑस्ट्रेलियात आहे.(welcome Rishabh Pant to the Biggest tournament of the year icc posts video)

क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाला खूप पुढे नेण्याची क्षमता पंतच्यात आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेत धावा करून भारताने सामने जिंकून त्याने त्याला सिद्ध केली आहे. टी-२० विश्वचषकमध्ये पण त्याच्याकडे चमकायची सुवर्णसंधी आहे. कदाचित त्यामुळेच आयसीसीनेही त्याच्यासाठी ही मोठी वेळ असल्याचे म्हटले आहे. गेल्या 9 वर्षांपासून भारत आयसीसी स्पर्धा जिंकण्याची वाट पाहत आहे आणि ही प्रतीक्षा संपवण्यात ऋषभ पंत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.

आयसीसीच्या शेअर प्रोमो व्हिडिओमध्ये, हेलिकॉप्टर सिडनीच्या ऑपेरा हाऊसवरून उडत आहे, तेव्हा सिडनी हार्बरच्या आतमध्ये ऋषभ पंत भव्य शैलीत बाहेर येतो. त्याच्या मोठ्या पावलांनी चालत शहराकडे जातो. यापूर्वी, आयसीसीने ऑस्ट्रेलियाचा महान अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलचा व्हिडिओ देखील शेअर केला होता. यामध्ये ग्लेन मॅक्सवेल जबरदस्त बॉडीमध्ये दिसत होता.

भारताने दुसऱ्या टी-20 सामन्यात इंग्लंडचा 49 धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. इंग्लंडविरुद्ध भारताचा हा सलग चौथा टी-20I मालिका विजय आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने 8 गडी गमावून 170 धावा केल्या. दुसऱ्या टी-20 मध्ये ऋषभ पंत रोहित शर्मासोबत सलामीला आला आणि टीम इंडियाला पॉवरप्लेमध्ये दणका दिला. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 17 षटकांत 121 धावांत गारद झाला.

Web Title: Icc T20 World Cup Promo Welcome Rishabh Pant To The Biggest Tournament Of The Year Icc Posts Video

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..