हार्दिक पांड्या म्हणतो, 'घड्याळांची किंमत ५ कोटी नव्हे तर...' | Hardik Pandya | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hardik Pandya

मी कायद्याने वागणारा माणूस आहे. मी स्वत: कस्टम अधिकाऱ्यांकडे गेलो असं म्हणत घड्याळं जप्त केल्याची अफवा असून घड्याळांची खरी किंमत पांड्याने सांगितली.

हार्दिक पांड्या म्हणतो, 'घड्याळांची किंमत ५ कोटी नव्हे तर...'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्याची पाच कोटींची दोन घड्याळे कस्टम विभागाने मुंबई विमानतळावर जप्त केल्याची चर्चा दोन दिवसांपासून होत आहे. आता यावर हार्दिक पांड्याने स्पष्टकरण देत अफवा असल्याचं म्हटलं आहे. त्याने ट्विटर अकाउंटवर याबाबत सविस्तर पोस्ट केली आहे. हार्दिक पांड्या म्हणाला की, माझी घड्याळे जप्त करण्यात आली नाहीत, तर मी स्वत: त्यांच्याकडे गेलो, कस्टम ड्युटी देण्यासाठी मी गेलो असंही पांड्याने सांगितलं.

घड्याळांच्या किंमतीबाबतही पांड्याने खुलासा केला आहे. याआधी घड्याळांची किंमत ५ कोटी असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र पांड्याने हे वृत्त फेटाळून लावत घड्याळे दीड कोटी रुपयांची असल्याचं सांगितलं आहे. दुबईतून भारतात परतल्यावर हार्दिक पांड्याकडून महागडी घड्याळे जप्त केल्याचं सांगण्यात येत होतं. कस्टम विभागाने केलेल्या चौकशीवेळी त्याला समाधानकारक माहिती देता आली नाही आणि बिलसुद्धा नव्हते असं म्हटलं जात होतं.

हार्दिक पांड्याने सोशल मीडियावर या सर्व चर्चेवर माहिती दिली आहे. त्यानं म्हटलं की, १५ नोव्हेंबरला दुबईतून परतल्यानंतर मी स्वत: कस्टम विभागाकडे गेलो होतो. त्यावेळी मला कस्टम ड्युटी भरता यावी यासाठी त्यांना सर्व गोष्टींबद्दल सांगितलं होतं ज्यांची खरेदी मी दुबईत केली होती.

हेही वाचा: ICC Most Valuable Team : बाबर कॅप्टन; टीम इंडियातील खेळाडूंची किंमत शून्य!

अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर खरेदीची सर्व कागदपत्रेसुद्धा जमा केली आणि घड्याळासह इतर सर्व वस्तूंची किंमतीवरून त्याची कस्टम ड्युटी ठरवण्यात येणार आहे. आता याबद्दल चुकीची माहिती पसरवली जात असल्याचं म्हणत पांड्याने स्पष्टीकरण दिलं आहे.

माझ्यावर करण्यात येणारे आरोप खोटे आहेत. मी कस्टमच्या अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य केलं आहे. अधिकाऱीसुद्धा त्यांचे काम करत आहेत. मी कायद्याने काम करणारा माणूस आहे असंही हार्दिक पांड्या म्हणाला आहे. याआधीही हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या अशा प्रकाराने चर्चेत आले

loading image
go to top