ICC Most Valuable Team : बाबर कॅप्टन; टीम इंडियातील खेळाडूंची किंमत शून्य! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit Sharma ,Virat Kohli And Babar Azam
ICC Most Valuable Team : बाबर कॅप्टन; टीम इंडियातील खेळाडूंची किंमत शून्य!

ICC Most Valuable Team : बाबर कॅप्टन; टीम इंडियातील खेळाडूंची किंमत शून्य!

ICC Most Valuable Team : युएईच्या मैदानात झालेल्या आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेनंतर आयसीसीने मोस्ट Most Valuable खेळाडूंचा 12 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या संघात एकाही भारतीय खेळाडूच्या नावाचा समावेश नाही. स्पर्धेत सुरुवातीपासून दमदार कामगिरी करुन सेमी फायनलमध्ये बाद ठरलेल्या पाकिस्तान संघाचा बाबर आझमची या संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

स्पर्धेत शतकी खेळी करणारा इंग्लंडचा जोस बटलर आणि ऑस्ट्रेलियन संघाला जेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या डेविड वॉर्नर या जोडीला सलामीवीर म्हणून पंसती देण्यात आली आहे. बाबर आझमने पहिल्या वहिल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये प्रभावी नेतृत्व दाखवून दिले होते. त्याला Most Valuable संघाचे कॅप्टन करण्यात आले आहे.

हेही वाचा: ICC च्या फ्रेममध्ये दिसले विराट-बाबर यांच्यातील प्रेम

श्रीलंकेचा असलंका, दक्षिण आफ्रिकेचा एडम मार्करम, पाकिस्तानचा मोहम्मद अली, श्रीलंकेचा हसरंगा, ऑस्ट्रेलियन, एडम झम्पा आणि जोश हेजलवडू, न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट, दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज नोर्तजे यांचा समावेश आहे. टीम इंडियाविरुद्ध भेदक मारा करुन चर्चेत आलेल्या पाकिस्तानी संघाचा जलदगती गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीला 12 वा खेळाडू आहे.

हेही वाचा: IPL मध्ये सुस्तावलेल्या वाघाची T20 World Cup मध्ये डरकाळी!

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाला प्रबळ दावेदार मानले गेले. कागदावरील हिरो मैदानात झिरो ठरले. पाकिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्धच्या सलग दोन पराभव टीम इंडियाला चांगलेच महागात पडले. या पराभवानंतर उर्वरित तीन सामने जिंकूनही टीम इंडिया स्पर्धेबाहेर फेकली गेली.

loading image
go to top