धोनीचा 'ट्रेंड' कोहली-रोहितनंतर कर्णधार पांड्याने ठेवला सुरू | Hardik Pandya Continued Trend MS Dhoni | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

hardik pandya continued trend

धोनीचा 'ट्रेंड' कोहली-रोहितनंतर कर्णधार पांड्याने ठेवला सुरू

टीम इंडिया आणि आयर्लंड यांच्यातील दुसरा टी-20 सामना 28 जूनला खेळला गेला. टीम इंडियाने हा रोमांचक असा सामना शेवटच्या चेंडूवर जिंकला. या विजयामध्ये मोठा वाटा दीपक हुडा आणि संजू सॅमसनचा होता. कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याने पुन्हा एकदा सर्वांची मने जिंकले आहे. टीम इंडियाने आयर्लंड दौऱ्यावर मालिकेत 2-0 ने कब्जा केला.

महेंद्रसिंग धोनीकडून कर्णधारपदाच्या अनेक युक्त्या शिकल्या आहे. हार्दिक पांड्याने हे आधीच सांगितले आहे. धोनीचे गुण त्याच्या कर्णधारपदावरून दिसून येत आहे. हार्दिकने कर्णधारपदाच्या पदार्पणाच्या हंगामात गुजरात टायटन्सला चॅम्पियन बनवले आहे. आयर्लंडविरुद्धच्या आताच्या मालिकेत भारताला 2-0 असा क्लीन स्वीप दिला. हार्दिकने ट्रॉफी उचलली, पण उचलताच त्याने युवा खेळाडू उमरान मलिककडे सोपवला. भारतीय संघात हा ट्रेंड महेंद्रसिंग धोनीने सुरू केला होता.

धोनी कर्णधार असताना जेव्हा जेव्हा एखादी स्पर्धा किंवा मालिका जिंकायचा तेव्हा ट्रॉफी घेतल्यानंतर संघाच्या युवा खेळाडूकडे सोपवत होता. धोनी अशा प्रकारे युवा खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवत होता. धोनीनंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनीही हा ट्रेंड सुरू ठेवला आणि आता हार्दिकही तेच करताना दिसत आहे.

भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर असून हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील संघ आयर्लंडच्या दौऱ्यावर दोन सामन्यांची T20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळण्यासाठी गेला होता. हार्दिकच्या नेतृत्वाखाली भारताने दोन्ही सामने जिंकले. आयर्लंडविरुद्धच्या या मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत असे दिग्गज खेळाडू नव्हते, जे सध्या इंग्लंडमध्ये आहेत.

Web Title: Hardik Pandya Continued Trend Captain Ms Dhoni Started After Virat Kohli Rohit Sharma Ireland Vs India

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..