Hardik Pandya : हर्दिक पांड्याचे पाणावले डोळे; बाबांची आठवण काढत म्हणाला..

Hardik Pandya emotional Remembered His Late Father
Hardik Pandya emotional Remembered His Late Fatheresakal

Hardik Pandya : भारताने शेवटच्या चेंडूवर पाकिस्तानला 4 विकेट्सनी मात देत टी 20 वर्ल्डकपची दमदार सुरूवात केली. भारताच्या विराट कोहली आणि हार्दिक पांड्याने 113 धावांची शतकी भागीदारी रचली. विराट कोहलीने 53 चेंडूत 82 धावा करून मोठा वाटा उचलला. मात्र हार्दिक पांड्याने देखील 37 चेंडूत 40 धावा करून त्याला मोलाची साथ दिली. सामना झाल्यानंतर हार्दिक पांड्या भावूक झाला. हार्दिक म्हणाला की, आज जर बाबा असते तर त्यांना खूप आनंद झाला असता.

भारताने पाकिस्तानवर शेवटच्या चेंडूवर विजय मिळवल्यानंतर 37 चेंडूत महत्वपूर्ण 40 धावा करणारा हार्दिक पांड्या भावूक झाला. त्याने या आनंदाच्या प्रसंगी आपल्या वडिलांची आठवण काढली. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हार्दिक पांड्या आपली खेळी वडिलांना समर्पित करत म्हणाला की, 'माझ्या वडिलांनी खूप त्याग केला आहे. फक्त मुलांसाठी एका शहरातून आपलं सगळं विकून दुसऱ्या शहरात येणं. मी हे करूच शकत नाही. मी माझ्या मुलावर खूप प्रेम करतो. त्याच्यासाठी सर्व काही करेन. मात्र माझ्या वडिलांनी दोन्ही मुलं 6 वर्षाची असताना सगळं सोडून येणं हा खूप मोठा त्याग आहे. मी कायम त्यांचा ऋणी राहीन.'

भारताने अखेर गेल्या वर्ल्डकपमधील दुबईतील पराभवाचे उट्टे मेलबर्नमध्ये लाखभर प्रेक्षकांच्या साक्षीने काढले. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 5 विकेट्स राखून पराभव करत वर्ल्डकपची दमदार सुरूवात केली. विराट कोहलीने 53 चेंडूत 83 धावा केल्या. त्याने हार्दिक पांड्याबरोबर पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचत गेलेला सामना खेचून आणला. भारताला शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 1 धावेची गरज असताना अश्विनने चौकार मारत सामना संपवला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com