Free Hit : 7 नो बॉलवर 33 धावांची लयलूट! हार्दिक म्हणाला गुन्हाच केला... |Hardik Pandya Arshdeep Singh No Ball | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hardik Pandya Arshdeep Singh No Ball Free Hit

No Ball Free Hit : 7 नो बॉलवर 33 धावांची लयलूट! हार्दिक म्हणाला गुन्हाच केला...

Hardik Pandya Arshdeep Singh No Ball Free Hit : भारताने श्रीलंकेविरूद्धचा दुसरा टी 20 सामना 16 धावांनी हरला. भारताने श्रीलंकेच्या 207 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 5 बाद 57 धावा अशी अवस्था झाली असताना देखील 190 धावांपर्यंत मजल मारली. भारताच्या पराभवाला जसे पॉवर प्लेमधील फलंदाजी कारणीभूत होती तशीच पॉवर प्लेमधील गोलंदाजी देखील जबाबदार होती.

अर्शदीप सिंगने सामन्याच्या दुसऱ्याच षटकात 3 नो बॉल टाकत कहर केला. भारताने संपूर्ण सामन्यात 7 नो बॉल टाकले. त्यावरील फ्री हिटवर 33 दावा उधळल्या. अर्शदीपने 19 व्या षटकात देखील 2 नो बॉल टाकत हार्दिक पांड्याच्या संयमाची चाचणीच घेतली.

हेही वाचा: Arshdeep Singh : N, N4, N6, अर्शदीप सिंगचे षटक संपेना... हार्दिक जाम वैतागला

हार्दिक पांड्या सामन्यात इतके नो बॉल टाकण्याबाबत सामना हरल्यानंतर बोलताना म्हणाला की, 'टी 20 क्रिकेटमध्ये नो बॉल टाकणं हा गुन्हा आहे. आम्हाला फलंदाजी आणि गोलंदाजीमधील पॉवर प्ले जड गेला. आम्ही खूप साध्या साध्या चुका केल्या. या स्तरावर अशा चुका होणे अपेक्षित नाही. अर्शदीपने यापूर्वी देखील नो बॉल टाकले आहेत. त्याला दोष देण्यासाठी नाही मात्र नो बॉल टाकणे हा गुन्हाच आहे.'

अर्शदीपने सामन्याच्या दुसऱ्या आणि आपल्या पहिल्या षटकात पहिल्याच चेंडूवर चौकार दिला. त्यानंतर अर्शदीपने आपली लय परत मिळवत सलग दोन चेंडू निर्धाव टाकत पहिल्या चौकाराची भरपाई केली होती. त्यानंतर चौथ्या चेंडूवर त्याने एक धाव तर पाचवा चेंडू निर्धाव टाकत आपले षटक यशस्वी करण्याचा प्रयत्न केला.

मात्र सहाव्या चेंडूवर अर्शदीप सिंगने माती खालली. त्याने सहावा चेंडू नो बॉल टाकला त्यावर कुसल मेंडीसला फ्री हिट मिळाली. या चेंडूवर धाव झाली नव्हती. अर्शदीपने फ्री हिटचा चेंडूवर चौकार खाल्ला वर तोही नो बॉल टाकला. त्यामुळे पुढच्या चेंडूवरही मेंडीसला फ्री हिट मिळाली. मेंडीसने त्याचा पुरेपूर फायदा उचलत त्यावरही षटकार मारला. अखेर चौथ्या प्रयत्नात अर्शदीपने राऊंड द विकेट गोलंदाजी करत एक धाव दिली आणि आपले षटक संपवले. (Sports Latest News)

हेही वाचा: Hardik Pandya IND vs SL : सामन्यापूर्वीच पांड्याने केली एक मोठी चूक; लंकेच्या कर्णधाराने उचलला फायदा

कर्णधार हार्दिकने या षटकातनंतर अर्शदीपला 18 षटकापर्यंत गोलंदाजी दिली नव्हती. मात्र अखेर हार्दिकने त्याला 19 वे षटक दिले. मात्र त्यातही अर्शदीपने 2 नो बॉल टाकत कहर केला. त्याने दोन नो बॉल टाकत अतिरिक्त 9 धावा दिल्या.

हेही वाचा : ...तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड