Hardik Pandya IND vs SL : सामन्यापूर्वीच पांड्याने केली एक मोठी चूक; लंकेच्या कर्णधाराने उचलला फायदा

Hardik Pandya IND vs SL 2nd T20 Toss
Hardik Pandya IND vs SL 2nd T20 Toss ESAKAL

Hardik Pandya IND vs SL 2nd T20 Toss : भारताचा नवा टी 20 कर्णधार हार्दिक पांड्या हा धोका पत्करणारा कर्णधार म्हणून ओळखला जातो. त्याच्यावर महेंद्रसिंह धोनीचा जास्त प्रभाव आहे. मात्र तो काही महेंद्रसिंह धोनी नाही. आज श्रीलंकेविरूद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात हे सिद्ध झाले. हार्दिक पांड्याने आजच्या सामन्यात एक मोठी चूक केली. ही चूक भारताला चांगलीच महागात पडली.

Hardik Pandya IND vs SL 2nd T20 Toss
IND vs SL 2nd T20I LIVE : भारतीय फलंदाज फज्जाला पाय लावून परतले; पहिल्या 5 षटकात पडल्या 4 विकेट्स

पुण्याचे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे ग्राऊंड हे तसे मोकळे ढाकळे ग्राऊंड म्हणून ओळखले जाते. तेथे संध्याकाळी वाऱ्याचा वेग चांगला असतो. त्यात पुण्याची खेळपट्टी जरी पाटा असली तरी ती संध्याकाळी वेगवान गोलंदाजांना साथ देते. त्यामुळे सहसा या मैदानावर संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारतात. मात्र हार्दिक पांड्याने आज नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा धक्कादायक निर्णय घेतला.

या निर्णयानंतर हार्दिक पांड्या म्हणाला की, 'आम्ही प्रथम गोलंदाजी करणार. सामन्यात नंतर दव पडण्याची शक्यता आहे. खेळपट्टी चांगली आहे यात बदल होईल असे वाटत नाही.' यानंतर समालोचकाने त्याला या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकतो अशी आठवण करून दिली. यावेळी त्याने अरे हे तर मला माहितीच नव्हतं असे उत्तर दिले.

दुसरीकडे दसुन शानका नाणेफेक गमावून देखील फलंदाजी करायला मिळाल्यावर म्हणाला की, आकडेवारी सांगते की या मैदानावर प्रथम फलंदाजी करणे योग्य ठरते. सर्वात महत्वाचे टॉप ऑर्डर क्लिक होणे गरजेचे आहे. मला वाटते की आमचे खेळाडू आजच्या सामन्यात चांगली कामगिरी करतील.

कर्णधार शानकाचा अंदाज खरा ठरला. लंकेने पहिल्या आठ षटकातच नाबाद 80 धावा चोपल्या. लंकेने कर्णधार शानकाच्या 22 चेंडूत केलेल्या नाबाद 56 धावांच्या जोरावर 206 धावा उभारल्या.

त्यानंतर लंकेच्या वेगवान गोलंदाजांनी पॉवर प्लेमध्ये चेंडू चांगला स्विंग केला. त्यांनी भारताची पहिल्या 5 षटकात 4 बाद 34 धावा अशी करत भारतीय फलंदाजीचे कंबरडेच मोडले. (Sports Latest News)

Hardik Pandya IND vs SL 2nd T20 Toss
Arshdeep Singh : N, N4, N6, अर्शदीप सिंगचे षटक संपेना... हार्दिक जाम वैतागला

हार्दिक पांड्याने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर देखील शेवटचे षटक फिरकीपटू अक्षर पटेलला देण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारचे निर्णय धोनी यापूर्वी घ्यायचा मात्र त्याला काही स्ट्रॅटेजिकल कारणे असायची. मात्र पांड्याने सामना झाल्यावर अक्षरला गोलंदाजी देण्याचे एक अजब कारण सांगितले होते. तो म्हणाला की मला माझ्या संघाने धोका पत्करावा असे वाटते. मोठ्या सामन्यापूर्वी ते अशा परिस्थितीतून जात स्वतःला तयार करतील असे त्याचे म्हणणे होते.

मात्र हे धाडस ज्यावेळी मालिका खिशात आली आहे त्यावेळी करणे संयुक्तिक असते. मालिकेच्या पहिल्याच सामन्यात नवख्या संघासोबत खेळताना असा धोका पत्करणे कधीकधी चांगलेच अंगलट येऊ शकते. असाच आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा आणि परिस्थितीचा नीट अभ्यास न करण्याचा फटका संघाला बसला.

हेही वाचा : ...तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com