Hardik Pandya : हार्दिकही संघात होणार दाखल, सूर्याचीही 49 धावांची खेळी; प्लेईंग 11 मध्ये कोणाची प्रबळ दावेदारी?

Hardik Pandya
Hardik Pandyaesakal

Hardik Pandya : भारताने इंग्लंडविरूद्धचा सामना 100 धावांनी जिंकला. भारताने गतविजेत्या इंग्लंडसमोर 230 धावांचे आव्हान ठेवले होते. रोहित शर्माने 87 धावांची तर सूर्यकुमार यादवने 49 धावांची दमदार खेळी केली. त्यामुळे भारतीय संघ लखनौच्या आव्हानात्मक खेळपट्टीवर 230 धावा करू शकला.

सूर्यकुमारच्या 49 धावांच्या खेळीमुळे त्याने आपली प्लेईंग 11 मधील दावेदारी प्रबळ केली होती. मात्र सामना संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दुखापतीने त्रस्त असलेल्या हार्दिक पांड्याबाबत एक मोठी बातमी समोर आली. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार हार्दिक पांड्या हा भारतीय संघात दाखल होण्यासाठी मुंबईला रवाना होणार आहे.

तो श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यापूर्वी संघात दाखल होईल. भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना 2 नोव्हेंबरला वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

Hardik Pandya
Pakistan Cricket : पाकिस्तान किक्रेटमध्ये राडा! PCB प्रमुखांनी बाबरचे Whatsapp चॅट केलं लीक

हार्दिक पांड्याच्या घोट्याला पुण्यातील बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात दुखापत झाली होती. त्यानंतर तो बंगळुरू येथील एनसीएमध्ये रिहॅबिलेटेशन करत आहे. तो वर्ल्डकपमधील न्यूझीलंड आणि इंग्लंड विरूद्धचा सामन्याला मुकला आहे. आता तो संघात परतणार असल्याचे वृत्त आहे.

विश्वसनीय सूत्र टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हणाला की, 'होय हार्दिक पांड्या सध्या बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीत दुखापतीतून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. तो मुंबईत संघाशी जोडला जाईल.'

'सध्याच्या घडीला हार्दिक पांड्या श्रीलंकेविरूद्धचा सामना खेळणार की नाही याबाबत खात्रीपूर्वक असं काही सांगता येत नाही. मात्र तो संघासोबत असणार आहे.'

Hardik Pandya
Srilanka vs Afghanistan : अफगाणिस्तान-श्रीलंका सामन्यासाठी पुण्यात वाहतुकीचे बदल, मुंबईवरुन येणाऱ्या प्रेक्षकांनी अशी घ्या काळजी

हार्दिक पांड्याबाबत गडबड होतेय?

हार्दिक पांड्या भारतीय संघात परतला तर ती संघासाठी आनंदाचीच बातमी असेल. बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात गोलंदाजी करताना त्याचा पाय दुखवला होता. त्यामुळे त्याला न्यूझीलंड विरूद्धचा सामन्याला मुकावे लागले. याचबरोबर इंग्लंड विरूद्धच्या सामन्यात देखील तो नव्हता.

त्याच्या अनुपस्थितीत भारताने सूर्यकुमार यादवला फलंदाज म्हणून आणि गोलंदाज म्हणून मोहम्मद शामीला संधी दिली. शार्दुल ठाकूरला देखील आपली प्लेईंग 11 मधील जागा गमवावी लागली. शामी आणि सूर्या दोघांनीही चांगली कामगिरी करत आपली संघातील दावेदारी प्रबळ केली आहे.

हार्दिक पांड्याने वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. त्यात त्याने 11 धावा आणि 5 विकेट्स घेतल्या आहेत. त्याला फलंदाजी करण्याची फारशी संधी मिळालेली नाही.

हार्दिक पांड्या त्वरित भारतीय संघात येईल याची शक्यता फार कमी आहे. भारतीय संघाने जवळपास सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारतीय संघाने हार्दिक संघात नसताना देखील सहजरित्या सामने जिंकले आहेत. आता भारतीय संघ आपला पुढचा सामना 2 नोव्हेंबर रोजी श्रीलंका आणि 5 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरूद्ध खेळणार आहे.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com