
Hardik Pandya : जय - विरूची नवी जोडी; पांड्या म्हणतो शोले 2 लवकरच येणार...
Hardik Pandya : भारताने न्यूझीलंडविरूद्धची तीन सामन्यांची वनडे मालिका 3 - 0 अशी जिंकली. आता भारतीय संघ टी 20 मालिकेतही न्यूझीलंडला व्हाईट वॉश देण्यासाठी सज्ज झाला आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील भारताचा टी 20 संघ पहिला सामना खेळण्यासाठी रांची येथे दाखल झाला आहे.
रांची म्हटलं की महेंद्रसिंह धोनी हे नाव सहाजिकत पहिल्यांदा मनात येतं. भारताचा कर्णधार हार्दिक पांड्या रांचीत आलाय आणि आपल्या मेंटॉर धोनीला भेटला नाही असं होणे नाही. हार्दिक पांड्याने रांचीत दाखल झाल्या झाल्या महेंद्रसिंह धोनीची भेट घेतली. यावेळी त्याने काही हटके फोटो शेअर केले.
हेही वाचा: Padma Shri : टीम इंडियाचे 'द्रोणाचार्य' यांना पद्मश्री, गुरूचरण सिंग यांनी भारताला दिले १२ क्रिकेटर
हार्दिक पांड्याने आपल्या इन्स्टाग्रामवर शोले चित्रपटात वापरण्यात आलेल्या गाडीचा फोटो शेअर केला. शोले चित्रपटातील जय - विरू अर्थात अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र जोडीने जी गाडी वापरली त्या गाडीत हार्दिक पांड्या आणि महेंद्रसिंह धोनीने फोटो काढला. हा फोटो हार्दिकने आपल्या इन्स्टावर शेअर करत त्याला शोले 2 लवकरच येतोय असे कॅप्शनही दिले.
हेही वाचा: Ranji Cricket : महाराष्ट्राविरुद्ध मुंबई बॅकफूटवरच
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेनंतर आता 3 सामन्यांची टी 20 मालिका 27 जानेवारीपासून सुरू होत आहे. पहिला सामना हा रांची येथे 27 जानेवारीला होत आहे. तर 29 जानेवारीला दुसरा टी 20 सामना लखनौ येथे होणार आहे. मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना 1 फेब्रुवारीला अहमदाबाद येथे होणार आहे. मालिकेतील सर्व सामना सायंकाळी 7 वाजता सुरू होणार आहेत.
न्यूझीलंडविरूद्धच्या टी 20 मालिकेसाठी निवडला गेलेला भारतीय संघ
हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, पृथ्वी शॉ, दीपक हुड्डा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम मावी, इशान किशन, जितेश शर्मा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, मुकेश कुमार
हेही वाचा : ....इथं तयार होतो आपला लाडका तिरंगा