

A rescue team pulls a tourist to safety after he slipped off the mountain cliff while taking a selfie.
esakal
Tourist fall incident during selfie : असं म्हणतात की देव तारी त्याला कोण मारी... याचाच प्रत्यय देणाऱ्या एका घटनेचा व्हिडिओ समोर आलाय. चीनमधील गुआंगआनमधील हुआइंग पर्वतावर एका पर्यटकाचा सेल्फी काढताना तोल गेला आणि तो थेट १३० फूट खोल दरीत पडला. अनेक दगडं, मोठी झाडं, काटेरी झुडपांमध्ये एवढ्या उंचीवरून पडूनही हा पर्यटक सुखरूप वाचला आहे.
या आश्चर्यकारक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. अनेकांना हा व्हिडिओ पाहूनही तो व्यक्ती वाचला असेल यावर विश्वास बसत नाही. तर घटनास्थळी उपस्थित अन्य पर्यटकांही ते दृश्य पाहून मोठ्याने ओरडत होते.
व्हायरल व्हिडिओमध्ये आपल्याला दिसते की, एक पर्यटक आपला फोन धरून एका अतिशय धोकादायक कड्याजवळ जाऊन सेल्फी काढण्याचा प्रयत्न करताना दिसतो. परंतु तितक्यात त्याचा पाय दगडावरून सटकतो आणि तो थेट दरी कोसळतो. यानंतर घटनास्थळी उपस्थित अन्य पर्यटक घाबरून ओरडल्याचे आणि त्या कड्याकडे धावताना दिसतात.
विशेष म्हणजे, द सनच्या मते तो माणूस कोणत्याही गंभीर दुखापतीशिवाय चमत्कारिकरित्या वाचला आहे. या भयानक घटनेनंतर, पर्यटकाने स्वतः चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म WeChat वर त्याचा अनुभव शेअर केला. त्याने लिहिले, "पर्वत देव माझ्यावर दयाळू होता आणि मी ४० मीटर (१३१ फूट) उंच कड्यावरून पडून वाचलो."
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.