T20 World Cup : विराटला मिठी मारत पांड्या ढसा ढसा रडला; फोटो व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

T20 World Cup

T20 World Cup : विराटला मिठी मारत पांड्या ढसा ढसा रडला; फोटो व्हायरल

टी20 वर्ल्डकप 2022 स्पर्धेच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारतीय संघाला इंग्लंड संघाने 10 विकेट्सने पराभूत केले. पराभवानंतर टी20 वर्ल्डकपमधील भारताचे आव्हान संपुष्टात आले. भारतीय खेळाडू या पराभवामुळे खूपच निराश असल्याचे दिसले. अशातच सामन्यानंतर मैदानातील विराट कोहली आणि हार्दिक पांड्याचा एक फोटो व्हायरल होताना दिसत आहे. (Hardik Pandya Virat Kohli emotional Photo Viral )

इंग्लंडकडून दारुण पराभव स्विकारावा लागल्यानंतर भारतीय खेळाडूंचे चेहरे निराश दिसले. या सामन्यात विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांनी शानदार फटकेबाजी केली. मात्र, पदरी निराशा पडली. या सामन्यात विराटसह हार्दिक पांड्यानेही अर्धशतक ठोकले.

हेही वाचा: विमा पाॅलिसींचे डी-मॅट पाॅलिसीधारकांनाच पोहचवेल नुकसान?

विराटने 40 चेंडूत 50 धावा केल्या. तर पांड्यानेही विस्फोटक फंलदाजी केली. त्याने 33 चेंडूत 63 धावा केल्या होत्या. या धावा करताना त्याने 4 चौकार आणि 5 षटकार मारले होते. या दोघांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने 6 विकेट्स गमावत 168 धावा चोपल्या होत्या. मात्र, इंग्लडच्या संघाने 16 षटकांत 168 धावांचे लक्ष्य सहज गाठले.

पराभव पाहताच हार्दिकला दुःख पचवता आले नाही. त्याने मैदानातच थेट विराटला मिठ्टी मारली. या भावूक क्षणांचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. त्याचा फोटोच नव्हे तर व्हिडीओदेखील व्हायरल होताना दिसत आहे.

T20 वर्ल्डकप 2022 च्या सेमिफायनल सामन्यात इंग्लंडकडून 10 विकेटने पराभव पत्कारावा लागला आहे. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडसमोर 169 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे इंग्लडच्या संघाने 16 षटकांत सहज गाठले.