Harmanpreet Kaur : 14 चेंडूत 56 धावा; हरमनचा पहिल्याच सामन्यात अर्धशतकी कारनामा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Harmanpreet Kaur WPL

Harmanpreet Kaur : 14 चेंडूत 56 धावा; हरमनचा पहिल्याच सामन्यात अर्धशतकी कारनामा!

Harmanpreet Kaur WPL : मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौरने WPL लीगच्या पहिल्याच सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली. तिने आपल्या संघाला फक्त पहिल्याच सामन्यात 200 धावांच्या पार पोहचवले नाही तर ती WPL लीगमध्ये पहिले अर्धशतक ठोकणारी फलंदाज देखील ठरली. हरमनप्रीत कौरने डी. वाय. पाटीलच्या पाटा खेळपट्टीवर सुरूवातीपासूनच आक्रमक फलंदाजी केली. तिने 30 चेंडूत 65 धावा ठोकल्या. यात तिने 14 चौकार ठोकत फक्त चौकारांनीच 56 धावा वसूल केल्या.

गुजरात जायंट्सने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. सलामीवीर यस्तिका भाटिया 1 धाव करून बाद झाली. मात्र दुसरी सलामीवीर हेली मॅथ्यूजने पॉवर प्लेमध्ये आक्रमक फलंदाजी करत नॅट सिवर ब्रंटसोबत दुसऱ्या विकेटसाठी 56 धावांची भागीदारी रचली. मात्र गुजरातच्या गोलंदाजांनी पुनरागमन करत ब्रेंटला 23 तर मॅथ्यूजला 47 धावांवर बाद केले. मॅथ्यूजचे अर्धशतक अवघ्या 3 धावांनी हुकले.

मात्र पाठोपाठ दोन्ही सेट झालेले फलंदाज बाद झाले तरी हरमनने आक्रमक फलंदाजी करत मुंबईला एमेलिया केरसोबत दीडशतकी मजल मारून दिली. कौरने 216.67 च्या सरासरीने 30 चेंडूत 65 धावा चोपल्या. अखेर स्नेह राणाने कौरची ही इनिंग 18 व्या षटकात संपवली. त्यानंतर केरने 45 धावा करत मुंबईला 207 धावांपर्यंत पोहचवले.

(Sports Latest News)

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....