पृथ्वी शॉला नीट हाताळा; हर्षा भोगलेंचा सल्ला

वृत्तसंस्था
बुधवार, 31 जुलै 2019

भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉने खोकल्यावर उपचार म्हणून घेतलेल्या औषधात उत्तेजकचा अंश सापडला आणि तो दोषी ठरला हे वृत्त वाऱ्यासारखे पसरले आणि मुंबईच नव्हे तर भारतीय क्रिकेटमध्येही खळबळ उडाली. यावर लोकप्रिय समालोचक हर्षा भोगले यांनी पृथ्वीला काळजीपूर्वक हाताळून त्याला योग्य मार्ग दाखवावा असा सल्ला बीसीसीआयला दिला आहे.

मुंबई : भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉने खोकल्यावर उपचार म्हणून घेतलेल्या औषधात उत्तेजकचा अंश सापडला आणि तो दोषी ठरला हे वृत्त वाऱ्यासारखे पसरले आणि मुंबईच नव्हे तर भारतीय क्रिकेटमध्येही खळबळ उडाली. यावर लोकप्रिय समालोचक हर्षा भोगले यांनी पृथ्वीला काळजीपूर्वक हाताळून त्याला योग्य मार्ग दाखवावा असा सल्ला बीसीसीआयला दिला आहे.

''या लहान मुलाने खूप कष्ट करुन यश मिळवलं आहे. त्यामुळेच भारतीय क्रिकेटने पृथ्वी शॉला खूप काळजीपूर्वक हाताळायला हवं आणि त्याला योग्य मार्ग दाखवायला हवा,'' असा सल्ला भोगले यांनी ट्विटरवरुन दिला आहे.

मुश्‍ताक अली स्पर्धेदरम्यान आपल्याला खोकला झाला होता त्यावेळी आपण त्यावरचे औषध घेतले होते. त्या औषधार बंदी असलेले उत्तेजक असल्याची आपल्याला माहिती नव्हती, अजाणतेपणी आपल्या हातून हे कृत्य झाले. कामगिरी उंचावण्यासाठी जाणीवपूर्वक आपण उत्तेजक घेतले नसल्याचा खुलाला पृथ्वीने बीसीसीआयच्या समितीसमोर केला त्याचा हा खुलासा मान्य करण्यात आला त्यामुळे त्याच्यावर आठ महिन्यांचीच बंदी घालण्यात आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Harsha Bhogale says Prithvi Shaw should be handled carefully