... म्हणून हार्दिक पांड्याला टीम इंडियातून डच्चू

मोहम्मद शमी आणिरविंद्र जडेजा दुखापतीतून सावरुन पुन्हा कमबॅक करणार असून 27 वर्षीय हार्दिक पांड्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय.
Hardik Pandya
Hardik Pandya twitter

न्यूझीलंड (New Zealand) विरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसह (World Test Championship Final) इंग्लंड दौऱ्यावर होणाऱ्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाची नुकतीच घोषणा झाली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंवर सिलेक्शन कमिटीने भरवसा दाखवला असून अनुभवी अष्टपैलू हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) संघातून डच्चू देण्यात आलाय. मोहम्मद शमी आणिरविंद्र जडेजा दुखापतीतून सावरुन पुन्हा कमबॅक करणार असून 27 वर्षीय हार्दिक पांड्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय. हार्दिक पांड्याला संघातून ड्रॉप (Hardik Pandya Dropped) करण्याबाबतच्या निर्णयावर क्रिकेट एक्सपर्ट हर्षा भोगले यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

हार्दिक पांड्या 100 टक्के फिट नाही. त्यामुळेच तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना बॉलिंग टाकताना दिसले नाही. अनफिट असल्यामुळेच त्याला संघात स्थान मिळवता आलेले नाही, असे हर्षा भोगले (Harsha Bhogle) यांनी म्हटले आहे. याशिवाय बॅटिंगमधील खराब कामगिरीमुळे त्याच्यावर ही वेळ आली, असेही ते म्हणाले.

Hardik Pandya
WTC Final साठी टीम इंडियाची घोषणा, असा आहे संघ

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (ICC World Test Championship) आणि इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर हर्षा भोगले यांनी एक ट्विट केले आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी जाताना भारतीय संघाने स्पिन ऑल राउंडरला पसंती दिली आहे. ही गोष्ट पहिल्यांदाच स्पष्ट होती. त्यामुळे हार्दिक पांड्या या संघाचा भाग नसणार हे अपेक्षितच होते. कुलदीप यादवकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष झाले, असा उल्लेखही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये केलाय.

Hardik Pandya
भारतीय क्रिकेटर्संना COVISHIELD लस घेण्याचा सल्ला

आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिप आणि इंग्लंड दौऱ्यावरील संघ निवडीपूर्वी आयपीएल स्पर्धेत हार्दिक पांड्याचा फ्लॉप शो पाहायला मिळाला होता. मुंबई इंडियन्सकडून खेळताना बॅटिंगमध्ये त्याला नावाला साजेसा खेळ करण्यात अपयश आले. आयपीएल स्पर्धेत त्याने एकही ओव्हर टाकली नाही. पांडयाने 2021 च्या आयपीएल हंगामातील 7 सामन्यात केवळ 52 धावा केल्या होत्या. टीम निवडीपूर्वीच विराट कोहलीने हार्दिक पांड्याविषयी मोठे वक्तव्य केले होते. केवळ फलंदाजीसाठी हार्दिकला कसोटी संघात स्थान मिळू शकत नाही, असे विराट कोहली (Virat Kohli) ने यापूर्वीच स्पष्ट केले होते.

हार्दिक पांड्या (Hardik Pandya) अजूनही टेस्ट क्रिकेट संघाचा नियमित सदस्य नाही. त्याने 2018 मध्ये इंग्लंड दौऱ्यावरच आपला अखेरचा कसोटी सामना खेळला होता. घरच्या मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यासाठी त्याची संघात निवड झाली होती. पण त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नव्हते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com