esakal | WTC Final साठी टीम इंडियाची घोषणा, असा आहे संघ
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Cricket Team

WTC Final साठी टीम इंडियाची घोषणा, असा आहे संघ

sakal_logo
By
सुशांत जाधव

ICC World Test Championship Indian squad : इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी शुक्रवारी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. इंग्लंड दौऱ्यावर अनुभवी शिखर धवनला संधी मिळेल, अशी चर्चा होती. पण त्याला संघात स्थान मिळालेले नाही. युवा शुभमन गिलवर निवड समितीने विश्वास दाखवलाय. न्यूझीलंड विरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसह भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध (Test series against England) पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.

हेही वाचा: IPL च्या उर्वरित सामन्यासाठी BCCI ला परदेशातून आली ऑफर

अभिमन्यू इश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, आरझन नागवासवाला यांना स्टॅडबाय प्लेयर्स म्हणून निवडण्यात आले आहे. अपेंडिक्समुळे त्रस्त असणाऱ्या लोकेश राहुलसह आयपीएल स्पर्धेवेळी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या वृद्धिमान साहासंदर्भातील निर्णय राखून ठेवण्यात आला असून फिटनेसवर ते इंग्लंडला जाणार की नाही हे निश्चित होणार आहे. सध्याच्या घडीला त्यांना संघात स्थान देण्यात आले आहे. भारत (Indian Cricket Team) आणि न्यूझीलंड (New Zealand national cricket team) यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळवण्यात येणार आहे. साउथ हॅम्पटनच्या रोज बाउलच्या क्रिकेट स्टेडियमवर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची पहिली फायनल खेळवली जाईल. 18 ते 22 जून रोजी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा बादशहा कोण? याचे उत्तर मिळणार आहे. भारतीय संघाने 72.2 टक्के विनिंग पर्सेटेजसह फायनलमध्ये प्रवेश केला असून न्यूझीलंड 70 टक्के विनिंग पर्सेंटेजस क्वालिफाय झाले आहे.

हेही वाचा: माजी क्रिकेटरच्या किडनॅपिंगमध्ये त्याच्या गर्लफ्रेंडचाच हात?

India's squad: विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उप कर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वाशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इंशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव.

Virat Kohli (C), Ajinkya Rahane (VC), Rohit Sharma, Gill, Mayank, Cheteshwar Pujara, H. Vihari, Rishabh (WK), R. Ashwin, R. Jadeja, Axar Patel, Washington Sundar, Bumrah, Ishant, Shami, Siraj, Shardul, Umesh.