esakal | टोकियो ऑलिंपिक
sakal

बोलून बातमी शोधा

tokyo olympics in japan

टोकियो ऑलिंपिक

sakal_logo
By
हर्षद भागवत

जगभरातील क्रीडा प्रेमी नागरिकांसाठी महत्वाचा "उत्सव" समजल्या जाणाऱ्या ऑलीम्पिक खेळांसाठी काउन्ट डाऊन सुरु झाले आहे. यंदाच्या ऑलंपिक स्पर्धा जपान मधील टोकियो शहरात येत्या २३ जुलै पासून सुरु होत आहेत. गेल्या दोन वर्षां पासून सुरु असलेल्या कोरोना महामारीनं या स्पर्धा एक वर्ष पुढेढकलण्यात आल्या. स्पर्धेबाबत वर्षभर अनेक वाद-विवाद झालेत. या स्पर्धा होणार किंवा नाही याबाबत अनेक अडथळे होते आणि अखेर जपान सरकारच्या सहकार्यानं आणि जागतिक ऑलंपिक समितीच्या पुढाकारानं या स्पर्धा संपन्न होत आहेत.

जपान मधील सामान्य नागरिकांचा अजूनही या स्पर्धांना तितकासा पाठिंबा नाहीये . नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात ७० टक्के नागरिकांचा या स्पर्धांना विरोधच आहे. या शिवाय जपान मधील हेल्थ एक्सपर्ट नी याबाबत नकार दर्शवला आहे. तरीही याबाबत जपान सरकार आग्रही आहे कारण त्यांना हा प्रतिष्ठेचा प्रश्नवाटतो आहे. या सर्व खेळांच्या तयारीवर गेल्या ४ ते ५ वर्षेपासून अब्जावधी डॉलर्सचा खर्च झाला आहे आणि जपान सरकारचं त्यासाठी योगदान आहे. शिवाय अंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती ( IOC ) ने सुद्धा यावर खूप खर्च केलेला आहे .

जपानच्या नेतृत्वाला जागतिक पातळीवर स्वतःला सिद्ध करण्याची ही एक संधी वाटते आहे . कारण गेल्याकाही वर्षात सुनामी सारख्या नैसर्गिक आपत्ती मुळे आणि आर्थिक मंदी मुळे जपान बॅक फुटवर गेला आहे. आर्थिक महासत्ता म्हणून जपानचं जागतिक स्थान डळमळीत झालेलं आहे.

आता पर्यंत जपान मध्ये ८.५ लाख लोक कोरोना पॉसिटीव्ह झालेले आहेत आणि १५ हजार हुनअधिक नागरिकांचा मृत्यू झालेला आहे. मे महिना सुरु होण्याच्या आसपास फक्त ५ टक्के लोकांचं लसीकरण जपान मध्ये झालेलं होतं आणि सद्य स्थितीत ३० टक्के पेक्षा कमी लोकांचं लसीकरण पूर्ण झालेलं आहे. म्हणजे संसर्गाचा धोका, जरुरी पेक्षा जास्तच आहे. म्हणून नागरिकांच्या जीवाशी खेळ नको असं जपानी नागरिकांना वाटतंय, तेथे बाबत काही प्रमाणात निदर्शने चालू झालेली होती. खबरदारीचा उपाय म्हणून, जपानमध्ये सार्वजनिक आणिबाणी जाहीर केलेली आहे . जपान मध्ये सार्वजनिकठिकाणी कडक निर्बंध असणार आहेत सामान्य नागरिकांना कोणतीही स्पर्धा बघता येणार नाहीये. याशिवाय जगभरातून येणाऱ्या ११,००० पेक्षा अधिक खेळाडूंना कडक चाचणी करूनच प्रवेश असेल त्यामुळे या सर्व स्पर्धा प्रेक्षकांशिवाय पार पडणार आहेत, हाही एक जागतिक विक्रम असेल.

भारताकडून एकूण २२८ खेळाडू , १७ प्रकारच्या विविध खेळांसाठी, या ऑलंपिक मध्ये भाग घेत आहेत . पी. व्ही. सिंधू हिच्या कडून बॅडमिंटन मध्ये अपेक्षा आहेत. दीपक पुनिया (कुस्ती ), मेरी कोम (बॉक्सिंग) आणि पुरुष हॉकी टीम यांचे कडून पदकांची अपेक्षा आहे. महाराष्ट्राच्या कन्या राही सरनोबत आणि तेजस्विनी सावंत यांच्या कडून रायफल नेमबाजीत २५ मीटर आणि ५० मीटर मध्ये काही अपेक्षा आहेत. आपल्या विशाल काय देशाचा विचार केला तर गेल्या अनेक वर्षात आपल्याला या जागतिक खेळांमध्ये चमकदार कामगिरी करता आलेली नाही. २०१२ साली झालेल्या लंडन ऑलिम्पिक, २०१६ च्या रिओ ऑलिम्पिक खेळांमध्ये एकही सुवर्ण पदक मिळवता आलेलं नाही ही मोठी खंत सतावते आहे. एकंदर खेळाबाबत सध्या भारतीय लोकांमध्ये जागृती वाढलेली दिसून येते आहे. परंतू त्याचं, जागतिक दर्जाची कामगिरी आणि गुणात्मक परिवर्तन याबाबत निराशा आहे. आपले अनेक खेळाडू ऑलिंपिक पात्रता फेरी देखील गाठू शकत नाही हेच वास्तव आहे.

कोरोना महामारीचा प्रभाव सर्व जगभर होता आणि आहे. अशा कठीण काळात अनेक अडथळे पार करून पुरेशी साधनं नसतांना अनेक खेळाडूं नी आपला सराव चालू ठेवलेला होता. एक विशिष्ट ध्येय बाळगून त्यांनी आपलं काम चालूच ठेवलंय त्यांच्या या जिद्दीला दाद द्यावीच लागेल आणि म्हणून या स्पर्धाविशेष महत्व ठेवतात .

हर्षद भागवत

(आंतर राष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक)

हेही वाचा: टोकियो ऑलिम्पिकमध्ये आढळला पहिला कोरोना संक्रमित

loading image