T20 World Cup : रोहित-द्रविडने 'या' खेळाडूची कारकीर्द संपली?, एकदा पण दिली नाही संधी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

harshal patel

T20 World Cup : रोहित-द्रविडने 'या' खेळाडूची कारकीर्द संपली?, एकदा पण दिली नाही संधी!

T20 World Cup 2022 : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली सध्याच्या टी-20 विश्वचषक मध्ये टीम इडिया चांगली कामगिरी करत आहे. भारतीय संघाने सुपर-12 फेरीतील चारपैकी तीन सामने जिंकले असून आता उपांत्य फेरीतील स्थान जवळपास पक्की केले आहेत. भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान, नेदरलँड आणि बांगलादेश यांचा पराभव केला तर एकमेव पराभव दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झाला. परंतु भारतीय संघात एक खेळाडू असा आहे, ज्याचा कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला नाही. संघात स्थान मिळवण्यासाठी या खेळाडूची तळमळ आहे.

हेही वाचा: Khel Ratna : 'खेलरत्न'साठी अचंता शरथ कमलची शिफारस; 'अर्जुन' पुरस्कारासाठी एकाही क्रिकेटपटूचे नाही नाव

टी-20 विश्वचषक 2022 च्या स्पर्धेत भारताने आतापर्यंत चार सामने खेळले आहेत, परंतु हर्षल पटेलला खेळण्याची संधी मिळालेली नाही. गेल्या एका वर्षात कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापनाने टी-20 विश्वचषकासाठी जे खेळाडू तयार केले होते. त्यात हर्षल पटेलचे नाव आघाडीवर होते. त्याने आपल्या स्फोटक कामगिरीने टीम इंडियाला अनेकवेळा विजय मिळवून दिला होता, पण आता प्रशिक्षक आणि कर्णधार कदाचित त्याचे नाव विसरले आहेत. डावाच्या सुरुवातीला आणि मधल्या षटकांमध्ये चांगली गोलंदाजी करतो.

हेही वाचा: T20 WC : भारताचा शेवटचा सामना पावसामुळे झाला नाही तर..., पाकिस्तान सेमी फायनल गाठणार?

हर्षल पटेल टी-20 क्रिकेटमधील त्याच्या किलर बॉलिंगसाठी प्रसिद्ध आहे. त्याची चार षटके विजय आणि पराभव यातील फरक ठरवतात, जेव्हा तो त्याच्या लयीत असतो तेव्हा तो कोणत्याही गोलंदाजीच्या आक्रमणाला फाटा देऊ शकतो. संथ गतीच्या चेंडूंवर तो खूप लवकर विकेट घेतो. टीम इंडियाकडून खेळताना त्याने 23 टी-20 सामन्यात 26 विकेट घेतल्या आहेत.