CWG 2022 : राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना हरियाणा सरकारनं काय काय दिलं बघा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Haryana Government Give Cash Prize And State Government Job For 29 CWG 2022 Medal Winner Players

CWG 2022 : राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना हरियाणा सरकारनं काय काय दिलं बघा!

CWG 2022 Medal Winner : बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने 61 पदक जिंकत पदक तालिकेत चौथे स्थान पटकावले. विशेष म्हणजे भारताच्या 61 पदक विजेत्या खेळाडूंमधील जवळपास दुप्पट खेळाडू हे हरियाणाचे आहेत. हरियाणाच्या 29 खेळाडूंनी यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला पदक मिळवून दिले. (Haryana Government Give Cash Price And State Government Job For 29 CWG 2022 Medal Winner Players)

हेही वाचा: Dinesh Karthik : रवी शास्त्री 'या' बाबतीत फार सहिष्णू नाही; कार्तिकने केला खुलासा

या भरीव कामगिरीनंतर हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी मंगळवारी बर्मिंगहम राष्ट्रकुल पदक विजेत्या खेळाडूंना रोख रक्कम पारितोषिक आणि सरकारी नोकरी देऊन त्यांचा सन्मान केला. यात सुवर्ण पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना दीड कोटी रूपये, रौप्य पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना 75 लाख रूपये आणि कांस्य पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना 50 लाख रूपये रोख रक्कम पारितोषिक म्हणून देण्यात आली. हरियाणा सरकारने फक्त पदक विजेत्यांचाच गौरव केला नाही तर राष्ट्रकुल स्पर्धेत चौथ्या स्थानावर राहिलेल्या खेळाडूंना देखील 15 लाख रूपये आणि राष्ट्रकुलमध्ये सहभाग घेणाऱ्यांना देखील 7.50 लाख रूपये दिले आहेत.

हेही वाचा: Venkatesh Prasad : प्रसादचा बारीक झालेला फोटो पाहून फॅन्स चिंतेत; प्रसाद म्हणाला मी...

हरियाणाच्या एकूण 29 खेळाडूंनी बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकली. या खेळाडूंवर हरियाणा सरकारकडून 25.80 कोटी रूपयांच्या बक्षिसाची उधळण करण्यात आली. याचबरोबर त्यांना राज्य सरकारमधील नोकरीचे नियुक्तीपत्र देखील देण्यात आले. यंदाच्या वर्षी हरियाणा राज्यातील 42 खेळाडूंनी राष्ट्रकुल स्पर्धेत भाग घेतला होता. राष्ट्रकुल स्पर्धेत महिला हॉकी संघाने कांस्य पदक जिंकले. त्या संघात 9 खेळाडू या हरियाणाच्या होत्या. याचबरोबर संघाची कर्णधार सविता पुनिया देखील हरियाणाच्या सिरसाची आहे.

Web Title: Haryana Government Give Cash Prize And State Government Job For 29 Cwg 2022 Medal Winner Players

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..