आणखी एक भारतीय होणार पाकची सून; करणार या गोलंदाजाशी लग्न

वृत्तसंस्था
मंगळवार, 30 जुलै 2019

भारताची टेनिसपटू सानिया मिर्झानंतर आता आणखी एक भारतीय पाकिस्तानची सून होणार आहे. साईनाने पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिकशी विवाह केला आहे. आता त्यानंतर हरियाणातील शामिया आरजू ही पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीशी पुढील महिन्यात लग्न करणार आहे. 

नवी दिल्ली : भारताची टेनिसपटू सानिया मिर्झानंतर आता आणखी एक भारतीय पाकिस्तानची सून होणार आहे. साईनाने पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिकशी विवाह केला आहे. आता त्यानंतर हरियाणातील शामिया आरजू ही पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीशी पुढील महिन्यात लग्न करणार आहे. 

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात जन्माला आलेला हसन अली आणि हरियाणाची निवासी शामिया यांचा विवाह दुबईच्या एटलांटिस पाम जुबेरा पार्क हॉटेलमध्ये होणार आहे. तर, हसन अलीनं 2013मध्ये स्थानिक क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. त्यानंर 2016मध्ये पाकिस्तानकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 2017च्या चॅम्पियन ट्रॉफी संघातही त्याला समावेश करण्यात आला होता. हसन अलीच्या नावावर 50 एकदिवसीय विकेट आहेत. हसन अली शेवटचा सामना वर्ल्ड कपमध्ये भारताविरोधात खेळला होता.

शामिया परिवारातील 10 सदस्य 17 ऑगस्टला दुबईला रवाना होणार आहेत.  "मुलीचे लग्न तर करायचे आहे. मग मुलगा भारताचा असो किंवा पाकिस्तानचा, याचा काही फरक पडत नाही. फाळणीनंतर आमचे नातेवाईक पाकिस्तानात गेले," असे मत शामियाचे वडील, लियाकत अलींने व्यक्त केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hasan Ali to get married with a Indian girl from Hariyana