या क्रिकेटरची पत्नी म्हणतीय, जोस बटलर माझा दुसरा पती; नेमकी काय आहे भानगड? | Have Adopted Jos Buttler as My Second Husband, Rassie van der Dussens Wife | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jos buttler
या क्रिकेटरची पत्नी म्हणतीय, जोस बटलर माझा दुसरा पती

या क्रिकेटरची पत्नी म्हणतीय, जोस बटलर माझा दुसरा पती; नेमकी काय आहे भानगड?

क्रिकेट जगतात एक खळबळ उडणारी माहिती समोर आली आहे. राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा दक्षिण अफ्रिकेचा फलंदाज रासी वान डर डुसेनची पत्नी लाराने जोस बटलरबद्दल खळबळजनक व्यक्तव्य केलं आहे. तिनं इंग्लंडचा क्रिकेटर जोस बटलर हा माझा दुसरा पती असल्याचे म्हटलं आहे.

हेही वाचा: राहुल कॅप्टन्सीची जबाबदारी घेण्याच्या पात्रतेचा नाही : मांजरेकर

रासी वान डर डुसेन आणि जोस बटलर आयपीएल २०२२ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहेत. राजस्थानचा संघ आज दुसऱ्या क्वालिफायर स्पर्धेत आरसीबीविरुद्ध खेळणार आहे.

या क्रिकेटरची पत्नी म्हणतीय, जोस बटलर माझा दुसरा पती; नेमकी काय आहे भानगड?

रासी वान डर डुसेनची पत्नी लाराने गमंतीने जोस बटलर तिचा दुसरा पती असल्याचे म्हटलं आहे. तिनं त्याला दुसऱ्या पतीरुपात मानलं आहे.

कारण IPL 2022 मध्ये जेव्हा जेव्हा जॉस बटलर षटकार ठोकतो तेव्हा तिच्याकडे कॅमेऱ्याचे लक्ष जाते. चाहत्यांनी चुकून रसी व्हॅन डर डुसेनची पत्नी लारा हिला जोस बटलरची पत्नी मानले आहे.

हेही वाचा: हॉटेल बुक होतं तारीख ठरली होती अन् RCB ने सांगावा धाडला

परंतु लाराने आता स्पष्ट केले आहे की, ती दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज रसी व्हॅन डर डुसेनची पत्नी आहे, जोस बटलरची नाही. जॉस बटलर जेव्हाही चौकार आणि षटकार मारत असे, तेव्हा कॅमेरा रासी व्हॅन डर ड्यूसेनची पत्नी लाराकडे टर्न केला जात होता. त्यामुळं क्रिकेट जगतात मोठा गैरसमज निर्माण झाला.

रासी वान डर डुसेनची पत्नी लारा म्हणाली, बटलरच्या पत्नीचे नाव लुईस आहे. मात्र, मी तिला कधीच भेटले नाही. क्रिकेटप्रेमींना वाटतं की मी बटलरची पत्नी आहे. आणि हे निश्चित आहे. कारण जेव्हा जेव्हा बटलर षटकार ठोकतो तेव्हा कॅमेरामध्ये मला कैद केले जाते.

माझा पतीदेखील राजस्थानकडून खेळतो. त्यामुळे टीम इंडियाचा पती युझवेंद्र चगलची पत्नी धनश्री आम्ही दोघी चिअर अप करत असतो. परंतु याचा अर्थ असा नाही की मी बटलरची पत्नी आहे. मात्र, मी हे सर्व स्विकारत आहे आणि मी पाठिंबादेखील देईन.

Web Title: Have Adopted Jos Buttler As My Second Husband Rassie Van Der Dussens Wife

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top