
राहुल कॅप्टन्सीची जबाबदारी घेण्याच्या पात्रतेचा नाही : मांजरेकर
माजी भारतीय क्रिकेट संजय मांजरेकर यांनी लखनौ संघाचा कर्णधार केएल राहुलवर निशाणा साधत गंभीर आरोप केले आहेत. तो एखादी जबाबदारी स्विकारेल असा खेळाडू नाही. आणि हे असे आत्ताच नाही तर यापूर्वीही त्याला दिलेली जबाबदारी स्विकारता आलेली नाही.
प्रत्येक सीझनमध्ये राहुलने खोऱ्यासारख्या धावा ओढल्या आहेत. यंदाच्या १५ व्या सीझनमध्येही असेच घडलं. त्याने १५ डावात ५० पेक्षा जास्त सरासरीने ६१६ धावा त्याने केल्या आहेत. पण अंतिम टप्प्यात त्याचा संघ फ्लॉप ठरला आहे. आरसीबीविरुद्ध खेळताना त्याने सर्वाधिक ७८ धावांची खेळी केली. पण क्रिकेट जगतात त्याच्यावर अनेक दिग्गजांनी टिकास्त्र सोडलं आहे. राहुलच्या मानसिकतेवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
हेही वाचा: पराभवानंतर गौतमचे 'गंभीर मंथन', के एल राहुलची घेतली शाळा
एका क्रिकेट वृत्तसंस्थेशी बोलताना माजी क्रिकेट संजय मांजेरकर यांनी राहुलच्या कॅप्टन्सीवर भाष्य केलं. पंजाब किंग्जसाठी खेळताना पण राहुल असाच खेळत होता. पण मी कोच असतो तर मी त्याला वेगळ्या पद्धतीने खेळायला सांगितले असते. माझ्या मते खेळपट्टीवर जास्तवेळ टिकण्यापेक्षा त्याने जास्त वेगाने धाव करण आवश्यक आहे. राहुल वेगानं धाव करतो तेव्हा संघाचा जास्त फायदा होतो, असं मांजेकर म्हणाले.
हेही वाचा: 'मी तर 600 रन केल्या'..: लखनऊच्या पराभवानंतर केएल राहुल झाला ट्रोल
तसेच, राहुलचे हे रूप मी आता अनेकदा पाहिले आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी यांसारख्या खेळाडूंनी दीर्घकाळ एकत्र येऊन आयपीएलमध्ये संघाचा आघाडीचा फलंदाज आणि कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडली, तर राहुलला वारंवार अपयश आले आहे. कदाचित तो या भूमिकेसाठी योग्य व्यक्ती नसेल. असा गंभीर आरोपदेखील त्यांनी यावेळी केला.
शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात अखेर रॉयल चॅलेंजर बेंगलोरने लखनौ सुपर जायंटचा 14 धावांनी पराभव करत आयपीएलमधून त्यांचा गाशा गुंडाळला.
Web Title: Sanjay Manjrekar Said Rahul Not The Right Player To Take Responsibility
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..