esakal | WI vs AUS: गेल नव्हे या कॅरेबियनच्या जाळ्यात फसले कांगारु
sakal

बोलून बातमी शोधा

Hayden Walsh

WI vs AUS: गेल नव्हे या कॅरेबियनच्या जाळ्यात फसले कांगारु

sakal_logo
By
सुशांत जाधव

ऑस्ट्रेलिया (Australia) संघ सध्याच्या घडीला वेस्ट इंडिज (West Indies) दौऱ्यावर आहे. टी 20 मालिकेनं दोन्ही संघातील सामन्यांची सुरुवात झालीये. पहिल्या दोन सामन्यातील पराभवानंतर ऑस्ट्रेलियन संघाने तिसरा सामना गमावत 5 सामन्यांची मालिकाही गमावली. या सामन्यात फलंदाजीत गेलचा धमाका तर पाहायला मिळालाच याशिवाय घरच्या मैदानावरील मालिका विजयात 29 वर्षीय कॅरेबियन गोलंदाज हेडेन वॉल्श (Hayden Walsh) याने मोठी भूमिका बजावलीये.

कॅरेबियन लेग स्पिनरने टी-20 सामन्यांच्या मालिकेत लक्षवेधी कामगिरी केलीये. त्याने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना चांगलेच नाचवले. डावखुऱ्या गोलंदाजाने निर्माण केलेल्या दबावामुळे ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी इतर गोलंदाजांना विकेट फेकल्याचेही पाहायला मिळाले. पहिल्या तीन टी-20 सामन्यातील 12 षटकात 70 धावा खर्च करुन त्याने 8 विकेट घेतल्या आहेत.

हेही वाचा: टी 20 मध्ये गेलचं वादळ; 41 व्या वर्षी केला विश्वविक्रम

पहिल्या टी-20 सामन्यात वॉल्शने आपल्या चार ओव्हर्सच्या कोट्यात 23 धावा खर्च करुन तिघांना माघारी धाडले. दुसऱ्या सामन्यातही त्याने 3 विकेट घेतल्या. दुसऱ्या सामन्यात 2 विकेटसह त्याने संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. यासाठी त्याने केवळ 18 धावा खर्च केल्या. कांगारुंसाठी तो खूपच धोकादायक ठरला आहे.

उर्वरित दोन सामन्यात आपल्या कामगिरीतील सातत्य कायम राखून त्याला मॅन ऑफ द सीरिज मिळवण्याची संधी आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या तीन सामन्यात त्याने 6.25 च्या सरासरीने 8 विकेट घेत टॉप विकेट टेकर बनलाय. त्याच्यापाठोपाठ मकाए दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 5 विकेट घेतल्या आहेत.

हेही वाचा: यशपाल शर्मांच्या करियरचं 'दिलीप कुमार कनेक्शन' माहितीये का?

वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाज सपशेल अपयशी ठरले आहेत. मिचेल मार्शलनं पहिल्या आणि दुसऱ्या टी-20 सामन्यात अर्धशतकी खेळी केली होती. त्याच्याशिवाय एकाही फलंदाजाला नावाला साजेसा खेळ करता आलेला नाही. परिणामी कांगारुंवर पराभवाची नामुष्की ओढावली आहे. उर्वरित दोन सामन्यात ते कशी कामगिरी करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेनंतर दोन्ही संघ 3 सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहेत. या मालिकेपूर्वी कांगारूंचा संघ उर्वरित दोन सामन्यातील विजयाने आत्मविश्वास प्राप्त करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

loading image