esakal | टी 20 मध्ये गेलचं वादळ; 41 व्या वर्षी केला विश्वविक्रम
sakal

बोलून बातमी शोधा

टी 20 मध्ये गेलचं वादळ; 41 व्या वर्षी केला विश्वविक्रम

टी 20 मध्ये गेलचं वादळ; 41 व्या वर्षी केला विश्वविक्रम

sakal_logo
By
सूरज यादव

वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज आणि युनिव्हर्सल बॉस म्हणून ओळखला जाणारा ख्रिस गेल हा काही महिन्यांपासून धावांसाठी झगडत होता. त्याचा धावांचा दुष्काळ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात संपल्याचं दिसलं. सुमार कामगिरीवरून टीका करणाऱ्यांना त्याने बॅटने प्रत्युत्तर दिलं आहे. 41 वर्षीय गेलने या वयातही फलंदाजीतला दम दाखवून दिला आहे. अजुनही टी20 मध्ये आपण खेळू शकतो हेच त्यानं सांगितलं आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात ख्रिस गेलनं 38 चेंडूत 67 धावांची खेळी केली. यात त्यानं 4 चौकार आणि 7 षटकारांची बरसात केली. गेलने 33 चेंडूत अर्धशतक साजरं केलं. यासह एक विश्वविक्रमसुद्धा गेलने स्वत:च्या नावावर केला. ख्रिस गेलने टी20 क्रिकेटमध्ये 14 हजार धावा केल्या असून अशी कामगिरी करणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे. गेलच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने तिसऱ्या सामन्यात विजय मिळवला आणि मालिकेवर पकड मिळवण्यासाठीही मदत झाली.

हेही वाचा: इंग्लंडमध्ये अश्विनचा विकेट मिळवण्यासाठीचा संघर्ष

ख्रिस गेलने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूडची धुलाई केली. त्याच्या एका षटकात तीन चौकार आणि एक षटकार लगावला. तसंच अॅडम झाम्पाच्या एका षटकात सलग तीन षटकार खेचले. गेल टी20 क्रिकेटमध्ये अर्धशतक करणारा सर्वात वयस्क खेळाडू ठरला आहे. आतापर्यंत गेलने टी20 क्रिकेटमध्ये 14 हजार धावा केल्या आहेत.

तिसऱ्या टी20 सामन्यात वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाला 6 गडी राखून पराभूत केलं. ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदा फलंदाजी करताना सहा बाद 141 धावा केल्या. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या विंडीजने 31 चेंडू आणि 6 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. कर्णधार निकोलस पूरनने 27 चेंडूत नाबाद 32 धावा केल्या. या विजयासह वेस्ट इंडिजने मालिकेत 3-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील चौथा सामना बुधवारी खेळवण्यात येणार आहे.

loading image