Cristiano Ronaldo In Tears : सुपरस्टार रोनाल्डो ढसाढसा रडला! व्हिडिओ व्हायरल

पोर्तुगालच्या संघाचा मोरोक्कोसमोर पराभव झाल्यानंतर ख्रिस्तियानो रोनाल्डोला बसला मोठा धक्का
Cristiano Ronaldo In Tears
Cristiano Ronaldo In Tearssakal

Cristiano Ronaldo In Tears : फिफा विश्वचषकाच्या तिसऱ्या उपांत्यपूर्व फेरीत पोर्तुगालच्या संघाचा मोरोक्कोसमोर पराभव झाल्यानंतर ख्रिस्तियानो रोनाल्डोला मोठा धक्का बसला आहे. हा पराभव त्याला सहन झाला नाही आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले आणि रडू लागले. पराभवानंतर त्याचा रडतानाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये रोनाल्डो रडताना दिसत आहे. रोनाल्डोचा रडण्याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याचे चाहतेही रडू लागतील. 'सुपरस्टार' ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पोर्तुगालचे जगज्जेतेपदाचे प्रयत्न उधळून लावताना स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारा पहिला आफ्रिकी देश बनण्याचा पराक्रम साधला.

Cristiano Ronaldo In Tears
Ishan Kishan : 'इशानने हॉटेलच्या रूममध्ये...', द्विशतक ठोकताच कोचचा धक्कादायक खुलासा

मोरोक्कोने अल थुमामा स्टेडियमवर झालेली उपांत्यपूर्व लढत १-० फरकाने जिंकली. ४२ व्या मिनिटास २५ वर्षीय युसूफ एन-नेसिरी याचे प्रेक्षणीय हेडिंग सामन्यात निर्णायक ठरले. सहाव्यांदा विश्वकरंडक स्पर्धेत खेळणाऱ्या मोरोक्कोने प्रथमच उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. मोरोक्कोच्या झुंजार खेळामुळे पोर्तुगालला तिसऱ्यांदा उपांत्य फेरी गाठणे शक्य झाले नाही. मोरोक्कन गोलरक्षक यासिन बोनो याची गोलनेटसमोर कामगिरी परत एकदा अभेद्य ठरली.

आठ मिनिटांच्या इंज्युरी टाईममधील तिसऱ्या मिनिटास वालिद शेदिरा याला रेड कार्ड मिळाले. एक खेळाडू कमी झाला, पण झुंजार मोरोक्कोने आघाडी निसटू दिली नाही. सामन्यातील अखेरचे मिनीट बाकी असताना पोर्तुगालच्या पेपे याचे हेडिंग हुकले आणि मोरोक्कोच्या आणखी एका ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब झाले.

एन-नेसिरीचे भेदक हेडिंग विश्रांतीला तीन मिनिटे बाकी असताना युसूफ एन-नेसिरी याचे हेडिंग भेदक ठरले. त्याचा हा गोल मोरोक्कोतर्फे विक्रमी ठरला.

Cristiano Ronaldo In Tears
Cristiano Ronaldo : ख्रिस्तियानो रोनाल्डो क्वार्टर फायनलमध्येही बेंचवरच

रोनाल्डो बेंचवरून मैदानात

पोर्तुगालचे प्रशिक्षक फर्नांडो सांतोस यांनी सलग दुसऱ्या सामन्यात ख्रिस्तियानो रोनाल्डोला बेंचवर बसवले. पूर्वार्धातील पिछाडीनंतर उत्तरार्धात रोनाल्डोला मैदानात पाठवण्यात आले. ५१ व्या मिनिटास मैदानात आलेल्या ३७ वर्षीय खेळाडूची ही आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील १९६ वी कॅप ठरली.

Cristiano Ronaldo In Tears
Cristiano Ronaldo : नेमारप्रमाणे रोनाल्डोचा स्वप्नभंग; मोरोक्कोने पोर्तुगालचा पराभव करत रचला इतिहास

दृष्टिक्षेपात.....

  • विश्वकरंडकात ३ गोल करणारा युसूफ एन-नेसिरी मोरोक्कोचा पहिला

  • फुटबॉलपटू- २०१८ मध्ये स्पेनविरुद्ध; तर यंदा कॅनडा व पोर्तुगालविरुद्ध गोल

  • विश्वकरंडक उपांत्यपूर्व लढतीत गोल करणारा युसूफ एन-नेसिरी चौथा आफ्रिकन खेळाडू

  • यापूर्वी कॅमेरुनचे इमॅन्युएल कुंदे व युजिन एकेके (१९९०) व घानाचा सुले मुंतारी (२०१०) यांचे उपांत्यपूर्व लढतीत गोल

  • मोरोक्कोचे यंदाच्या स्पर्धेत ४ क्लीन शीट्स, त्यापैकी ३ लढतीत यासिन बोनो गोलरक्षक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com