Cristiano Ronaldo : नेमारप्रमाणे रोनाल्डोचा स्वप्नभंग; मोरोक्कोने पोर्तुगालचा पराभव करत रचला इतिहास

Morocco Defeat Portugal Yassine Bounou
Morocco Defeat Portugal Yassine BounouEsakal

Morocco Defeat Portugal Yassine Bounou : इतिहासात पहिल्यांदाच वर्ल्डकपची क्वार्टर फायनल खेळणाऱ्या मोरोक्कोनो पोर्तुगलाचा 1 - 0 असा पराभव करत सेमी फायनल गाठली. त्यामुळे काल नेमारचा स्वप्नभंग झाला तर आज तेच दुःख रोनाल्डोच्या वाट्याला देखील आले. रोनाल्डोसाठी हा शेवटचा वर्ल्डकप होता. त्याला वर्ल्डकपमधील आठ बाद फेरीतील सामन्यात एकही गोल करण्यात यश आलेले नाही. आता तो पुन्हा पोर्तुगालकडून खेळले की नाही याची शाश्वती नाही. सध्याच्या युगातील तीन अव्वल फुटबॉल म्हणून नेमार, रोनाल्डो आणि मेस्सी यांचे नाव घेतले जाते. त्याला आता मेस्सीचा अर्जेंटिनाच फक्त सेमी फायनलमध्ये पोहचला आहे.

दुसरीकडे मोरोक्कोने इतिहासात पहिल्यांदाच सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. 42 व्या मिनिटाला मोरोक्कोच्या युसेफने उत्कृष्ट हेडरद्वारे गोल केला. हा गोल पाहून पहिल्या हाफमध्ये बेंचवर बसलेला रोनाल्डो देखील अवाक झाला. या गोलमुळेच मोरोक्को हा वर्ल्डकपच्या सेमी फायनलमध्ये जाणारी पहिली आफ्रिकन देश ठरला. यापूर्वी कॅमेरून (1990), सेनेगल (2002), घाना (2010) हे क्वार्टर फायनलमध्येच हरले होते.

Morocco Defeat Portugal Yassine Bounou
Cristiano Ronaldo : ख्रिस्तियानो रोनाल्डो क्वार्टर फायनलमध्येही बेंचवरच

फिफा वर्ल्डकप 2022 च्या क्वार्टर फायनल सामन्यात पोर्तुगालने पुन्हा एकदा स्टार स्ट्रायकर रोनाल्डोला बेंचवर बसवले. पहिल्या हाफमध्ये सुरूवातीपासूनच पोर्तुगालने मोरक्कोच्या गोलपोस्टवर सातत्याने चढाया करत त्यांच्यावर दबाव निर्माण केला होता. मात्र मोरोक्कोचा गोलकिपर बुनोने पोर्तुगाचे आक्रमण थोपवून धरले. सामना जसजसा पुढे सरकत गेला मोरोक्कोने देखील आपल्या आक्रमणाची धार वाढवली. मात्र पासेस आणि बॉल पजेशनच्या बाबतीत उजव्या असलेल्या पोर्तुगालचा गोलपोस्ट अखेर 42 व्या मिनिटाला मोरोक्कोच्या युसेफने भेदला. त्याने उंच हवेत उंडी मारत रोनाल्डो स्टाईलने हेडरवर गोल करत पहिला हाफ संपायला काही मिनिटे शिल्लक असतानाच आघाडी घेतली. पहिला गोल खाल्यानंतर पोर्तुगालने प्रतिहल्ला चढवला. फर्नांडेसने एक जोरदार फटका मोरक्कोच्या गोलपोस्टच्या दिशने मारला. मात्र हा फटका गोलपोस्टच्या बारला लागून बाहेर गेला. अखेर हाफ टाईम संपला आणि मोरोक्कोने 1 - 0 अशी आघाडी घेतली.

Morocco Defeat Portugal Yassine Bounou
Neymar : क्रोएशियाकडून झालेला पराभव जिव्हारी; नेमारने निवृत्तीबाबत केलं मोठं वक्तव्य

दुसऱ्या हाफमध्ये अवघ्या काही मिनिटात पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो मैदानात उतरला. त्यानंतर पोर्तुगालने गोलची परतफेड करण्यासाठी मोरोक्कोच्या गोलपोस्टवर एका पाठोपाठ एक चढाया करण्यास सुरूवात केली. मात्र या पोर्तुगालचे आक्रमण मोरोक्कोचा गोलकिपर यासिन बुनोने आपली गोलपोस्ट अभेद ठेवली. रोनाल्डोला देखील फारशी हालचाल करू दिली नाही. दुसऱ्या हाफमध्ये 90 मिनिटे पोर्तुगालला गोल फोडण्यात यश आले नाही. शेवटच्या क्षणी रोनाल्डोने मोरक्कोच्या गोलपोस्टवर एक जोरदार फटका मारला मात्र बुनो पुन्हा आडवा आला. अखेर मोरक्कोने आपली गोलपोस्ट 9 मिनिटाच्या स्टॉपेज टाईममध्ये देखील अभेद ठेवत सामना 1 - 0 असा जिंकत इतिहास रचला.

हेही वाचा : Credit Score :असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com