Heinrich Klaasen : दबावाखाली आमचा संघ सर्वोत्तम; क्लासेनची इंग्लंडविरुद्धच्या विजयानंतर प्रतिक्रिया

दक्षिण आफ्रिकन क्रिकेट संघाने आतापर्यंत एकापेक्षा एक अशा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना जन्म दिला
Heinrich Klaasen reaction after the win against England Our team is best under pressure
Heinrich Klaasen reaction after the win against England Our team is best under pressureSakal

मुंबई : दक्षिण आफ्रिकन क्रिकेट संघाने आतापर्यंत एकापेक्षा एक अशा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना जन्म दिला आहे; मात्र यानंतरही त्यांना आतापर्यंत एकदाही विश्‍वकरंडक जिंकता आलेला नाही. याच कारणामुळे त्यांना ‘चोकर्स’ अर्थातच दबावाखाली गळपटणारा संघ म्हणून संबोधले जाते.

यंदाच्या विश्‍वकरंडकात मात्र हा संघ नव्या जोमाने मैदानात उतरलेला दिसत आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर गतविजेत्या इंग्लंडचा धुव्वा उडवल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा शतकवीर हेनरिच क्लासेन याप्रसंगी आत्मविश्‍वासाने म्हणाला, आमचा संघ दबावाखाली सर्वोत्तम खेळ करतो, हे आता जगाला दाखवण्याची वेळ आली आहे.

क्लासेन पुढे नमूद करतो की, विश्‍वकरंडकाच्या इतिहासावर नजर टाकल्यास दक्षिण आफ्रिकन संघाने छान खेळ केला आहे, हे दिसून येईल. महत्त्वाच्या सामन्यांमध्ये योजना कामाला आल्या नाहीत. त्यामुळे विश्‍वकरंडकापासून आम्ही दूर राहिलो आहोत; पण आम्ही प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये वाईट खेळलेलो नाही.

क्लासेन याने इंग्लंडविरुद्धच्या लढतीत ६७ चेंडूंमध्ये १२ चौकार व ४ षटकारांची आतषबाजी करताना १०९ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. या खेळीबाबत तो म्हणाला, माझ्या कारकिर्दीतील ही सर्वोत्तम खेळी ठरली आहे. मुंबईतील हवामानात कमालीची आर्द्रता होती, असह्य उकाडा होता, धाव घेताना दमछाक होत होती, अशा परिस्थितीत शतक झळकावता आले. यामुळे माझ्यासाठी ही खेळी खरोखरच स्पेशल होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com