AUSvsNZ : उंच हवेत तीन बोटांमध्ये घेतलेला निकोल्सचा हा झेल एकदा बघाच 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 27 डिसेंबर 2019

मात्र, चेंडू त्याच्या बॅट आणि ग्लोव्हजला लागून गलीमध्ये उंच उडाला. तिथे उभा असलेल्या निकोल्सने हवेच उंच उडी मारत फक्त तीन बोटांमध्ये झेल पकडला. त्याच्या या झेलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

मेलबर्न : ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु असेलेल्या बॉक्सिंग डे सामन्यात काल एक भन्नाट झेल पाहण्यास मिळाला. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी स्टिव्ह स्मिथ शतकाकडे वाटचाल करत होता. मात्र, हेन्री निकोल्सने केवळ तीन बोटांत घेतलेल्या झेल घेत त्याला माघारी धाडले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

स्मिथने पहिल्या डावात 85 धावा केल्या. तो 242 चेंडू खेळला. बराच वेळी स्मिथ बाद होत नाही म्हटल्यावर न्यूझीलंडच्या संघाने त्याच्यावर बाउन्सरचा मारा सुरु केला. स्मिथसुद्धा न्यूझीलंडने तयार केलेल्या चक्रव्यूहात अडकला. नील वॅगनरच्या गोलंदाजीवर स्मिथ फसला आणि त्याने बाउन्सवर बचाव करण्याचा प्रयत्न केला. 

संघातून बाहेर जायच्या भीतीने त्याने लपवली दुखापत 

मात्र, चेंडू त्याच्या बॅट आणि ग्लोव्हजला लागून गलीमध्ये उंच उडाला. तिथे उभा असलेल्या निकोल्सने हवेच उंच उडी मारत फक्त तीन बोटांमध्ये झेल पकडला. त्याच्या या झेलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

पाकला दाखवली लायकी; गांगुलींनी उचललं 'हे' मोठं पाऊल

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 467 धावा केल्या. आता न्यूझीलंड 50 धावा पूर्ण करण्याच्या वाटेवर आहे आणि त्यांचे 2 फलंदाज बाद झाले आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Henry Nichols grabbed a stunning catch of Steve Smith in Boxing Day Test