
भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला कोलकाता उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिलाय. उच्च न्यायालयानं शमीला पत्नी हसीन जहाँ आणि मुलगी आयरा यांना दरमहा चार लाख रुपयांची पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत. शमी आणि हसीन जहाँ बऱ्याच काळापासून विभक्त राहत आहेत. न्यायालयाचा निर्णय १ जूनपासून लागू झाला आहे. शमीला ही रक्कम मेंटनन्स म्हणून द्यावी लागणार आहे. यात पत्नीला दीड लाख रुपये तर मुलीला अडीच लाख रुपये खर्चासाठी द्यावे लागतील.