लेकीने पदक जिंकले, पुलेला गोपिचंदने मिठी मारली! त्रिशा-गायत्रीची BWF World Championships मध्ये ऐतिहासिक कामगिरी; भावनिक क्षण Video

Treesa Jolly Gayatri Gopichand medal : भारतीय बॅडमिंटनसाठी अभिमानाचा आणि भावूक करणारा क्षण पाहायला मिळाला. त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद या भारतीय जोडीने BWF World Championships 2026 मध्ये ऐतिहासिक कामगिरी करत पदक निश्चित केले.
 BWF World Championships 2026

Treesa Jolly Gayatri Gopichand historic medal BWF World Championships 2026

esakal

Updated on

Pullela Gopichand emotional hug Gayatri after World Championships medal: त्रिशा जॉली आणि गायत्री गोपिचंद या जागतिक क्रमवारीत ३९ व्या क्रमांकावर असेल्या भारतीय जोडीने शुक्रवारी जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली. भारतीय खेळाडूंनी चौथ्या मानांकित चीनच्या जिया यी फॅन व झँग शू झियान जोडीचा पराभव करून महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी अरेना येथे सुरू असलेल्या या स्पर्धेतील विजयानंतर भारताचा महान बॅडमिंटनपटू व प्रशिक्षक पुलेला गोपिचंद यांनी आपली लेक गायत्रीला मिठी मारली. तो क्षण चाहत्यांना भावनिक करणारा ठरला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com