esakal | हिटमॅन रोहित शर्मा हावरट? काय म्हणाला कॅप्टन कूल धोनी?
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit_Sharma_MS_Dhoni

- पाचवेळा आयपीएल जिंकल्यानंतरही त्याचं पोट भरलेलं नाही.

हिटमॅन रोहित शर्मा हावरट? काय म्हणाला कॅप्टन कूल धोनी?

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

Vivo IPL 2021 : पुणे : व्हिवो २०२१चा हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे, त्यामुळे आयपीएलचे अधिकृत प्रसारक (Broadcaster) असलेल्या स्टार स्पोर्ट्सने यंदाचा 'इंडिया का अपना मंत्र' या हॅशटॅगने दोन जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. या जाहीरातीमध्ये टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार कॅप्टन कूल एम. एस. धोनी प्रमुख भूमिकेत दिसून येतो. एका जाहिरातीमध्ये तो भिक्षूकाच्या भूमिकेत दिसत असून त्याने टक्कलही केलं आहे, या जाहीरातीची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. 

या जाहीरातीची चर्चा होण्याचं आणखी एक कारण म्हणजे या जाहिरातीत हिटमॅन रोहित शर्माचाही उल्लेख करण्यात आला आहे. टीम इंडियाचा तडाखेबंद फलंदाज असलेल्या रोहित लोभी असल्याचं म्हटलं आहे. 

हरभजन सिंगकडे पुन्हा 'गुड न्यूज'; शेअर केले स्पेशल फोटो!​

हिटमॅन रोहितने पाच आयपीएल जेतेपदं जिकली असल्याची कहाणी धोनी सांगत आहे. पण लोभी असणं हे चांगलं आहे का वाईट हे धोनी लहान मुलांना सांगत आहे. पाच वेळा आयपीएल जिंकल्यानंतरही त्याचं पोट भरलेलं नाही. तेव्हा त्याच्या पुढे बसलेला एक मुलगा लोभ असणं वाईट आहे का असं विचारतो तेव्हा धोनी म्हणतो, नाही बाळा. व्हिवो आयपीएलचा नवीन मंत्र आहे की, जर लोभामुळं जर तुमची जिंकण्याची भूक वाढत असेल तर लोभ असणं ठीक आहे. यावर एक मुलगा म्हणतो की, मग हिटमॅन रोहित यावेळी हॅट्ट्रिक करणार का? त्याला उत्तर देताना धोनी म्हणतो, कुणाचा मंत्र कामी येईल, हे व्हिवो आयपीएलमध्येच कळेल. 

IPL आधी पृथ्वीचं तुफान, दिग्गजांना लाजवेल असा केला विक्रम​

दरम्यान, या जाहीरातीमधील धोनीच्या लूकची सध्या जोरदार चर्चा आहे. 'कॅप्टन कूल' धोनीने हा लूक खास 'आयपील'च्या १४व्या हंगामा संदर्भातील जाहिरातीसाठी केला आहे. धोनीच्या हेअरस्टाईलचे अनेक चाहते आहेत. पण धोनीनं टक्कल केलेला पाहून त्याच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. 

धोनी हा बौद्ध भिक्खूच्या वेषामध्ये या जाहिरातीत दिसतो आहे. सारे क्रिकेटप्रेमी IPL 2021ची आतुरतेने वाट पाहत आहेत. चेन्नई सुपर किंग्स १० एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्ससोबत आपला पहिला सामना खेळणार आहे. या हंगामातदेखील महेंद्रसिंग धोनी हाच संघाचे नेतृत्व करणार असून तो चेन्नईच्या संघाला फायनलपर्यंत घेऊन जातो का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

पाहावं ते नवलंच... IPL आधी धोनीचा नवा लूक होतोय व्हायरल, पाहा नक्की आहे प्रकरण​

 - क्रीडा विश्वातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image
go to top