Major Dhyan ChandSakal
क्रीडा
Major Dhyan Chand: हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांना खेळताना पाहिलंय का? हॉकी इंडियाने शेअर केला Video
Major Dhyan Chand Video: हॉकी इंडियाने मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या खेळाची झलक दाखवणारा व्हिडिओ शेअर केला आहे.
Major Dhyan Chand: हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांचं भारतीय क्रीडा क्षेत्रातील योगदान अमुल्य आहे. त्यांना सर्वकालिक सर्वोत्तम खेळाडूंमध्ये गणले जाते. दुसऱ्या महायुद्धापूर्वी त्यांनी त्यांच्या खेळाने जगाचं लक्ष वेधलं होतं. त्यामुळे त्यांचा जयंतीनिमित्त दरवर्षी भारतात क्रीडा दिनही साजरा केला जातो.
ध्यानचंद यांनी १९२८, १९३२ आणि १९३६ साली भारतीय हॉकी संघाला ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. प्रयागराज येथे २९ ऑगस्ट १९०५ साली जन्मलेल्या ध्यानचंद यांनी तत्कालिन ब्रिटीश भारतीय सेनेकडून हॉकी खेळायला सुरुवात केली होती.