जपाननं ऑलिम्पिक चॅम्पियन टीम इंडियाला रोखून दाखवलं |Asian Champions Trophy | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Asian Champions Trophy India Vs Japab

जपाननं ऑलिम्पिक चॅम्पियन टीम इंडियाला रोखून दाखवलं

Asian Champions Trophy, India Vs Japan Semifinal At Dhaka : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी (Asian Men Champions Trophy ) स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये भारतीय संघाला जपानने पराभवाचा धक्का दिला. या पराभवामुळे हॉकी इंडियाचे (Hockey India) आशियाई चॅम्पियन होण्याचे स्वप्न भंगले आहे. जपानने 5-2 असा विजय नोंदवत फायनल गाठली असून ते पहिल्या सेमीफायनलमध्ये विजेत्या दक्षिण कोरिया विरुद्ध जेतेपदासाठी भिडतील. दक्षिण कोरियाने पाकिस्तानला नमवून फायनल गाठली आहे. साखळी फेरीत भारतीय संघाने जपानचा 6-0 असा धुव्वा उडवला होता. या पराभवाची परतफेड करत जपानने ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक विजेत्या टीम इंडियाला पराभूत करुन दाखवलं.

पहिल्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाला चांगलाच संघर्ष करावा लागला. जपानने आक्रमक खेळ करत भारतीय संघाला पिछाडीवर ढकलले होते. पहिल्या क्वार्टरमध्ये जपानने 2-0 अशी आघाडी घेतील होती. भारताने जपानला 6 पेनल्टी कॉर्नर दिले. त्याचा टीम इंडियाला चांगलाच फटका बसला.

हेही वाचा: अश्विनने रवी शास्त्रींबाबत केले मोठे विधान

दुसऱ्या क्वार्टरमध्ये टीम इंडियाने जबरदस्त कमबॅक केले. दिलप्रीत सिंहने भारतासाठी पहिला गोल डागत संघाचे खाते उघडले. स्कोअर 2-1 असा असताना जपानला आणखी एक गोल करण्याची संधी मिळाली. पण भारतीय गोलकिपरने त्यांची ही संधी हाणून पाडली. तिसऱ्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघात चांगलीच भिडत पाहायला मिळाली. मात्र अखेरच्या टप्प्यात भारताने जपानला पेनल्टी कॉर्नर दिला. याच प्रतिस्पर्ध्यांनी गोल करुन सोन करत आघाडी 3-1 अशी भक्कम केली.

हेही वाचा: PKL Season 8 : जाणून घ्या 12 संघातील Raiders अन् Defenders

तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाने आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला. पण गोल करण्यात खेळाडू अपयशी ठरले. दरम्यान जपानने आणखी एक गोल डागून टीम इंडियाचे टेन्शन वाढवले. इथेच न थांबता जपानने सामन्यात 5-1 अशी आघाडी मिळवली होती. अखेरच्या टप्प्यात भारतीय संघाने 2 गोल डागले. पण त्यावेळी वेळ निघून गेली होती.

आशियाई चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेतील अपराजित प्रवासाला सुरुंग

बांगलादेशमधील ढाका येथे सुरु असलेल्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघाने दमदार कामगिरी केली होती. सलामीच्या लढती दक्षिण कोरिया विरुद्धचा सामना 2-2 असा बरोबरीत राहिला होता. त्यानंतर बांगलादेश, पाकिस्तान आणि जपान यांच्या विरुद्ध दमदार विजय नोंदवत भारतीय संघाने आशियाई स्पर्धेत चॅम्पियन रुबाब मिरवण्याचे संकेत दिले होते. पण जपानने त्यांचे हे स्वप्न धुळीस मिळवले. साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात टीम इंडियाने जपानला 6-0 असे पराभूत केले होते. त्यामुळे सेमी फायनलमध्ये भारतीय संघाचे पारडे जड होते. पण जपानने अप्रतिम खेळ करत टीम इंडियाला पराभवाचा दणका दिला.

Web Title: Hockey Japan Beat India In Semifinal And Reach Asian Men Champions Trophy Final

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :hockey
go to top