India Vs Pakistan Asia Cup : भारत - पाकिस्तान फायनलचा आज थरार... कधी अन् कोठे पहायचा सामना?

India Vs Pakistan Asia Cup
India Vs Pakistan Asia Cupesakal

India Vs Pakistan Asia Cup : क्रिकेटच्या आशिया कपमध्ये भारत पाकिस्तान सामना होणार की नाही याबाबत जरी सभ्रमता असली तरी हॉकीच्या मैदानात आज हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकांना भिडणार आहे. हॉकी ज्युनियर आशिया कप 2023 स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहचला आहेत. गतविजेता भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ या स्पर्धेत चांगले खेळले आहेत. त्यांनी सखाळी फेरीत मोठे विजय मिळवले आहेत. लीग स्टेजमध्ये 10 संघांनी भाग घेतला होता.

India Vs Pakistan Asia Cup
India vs Australia : पावसाने WTC Final मध्ये देखील खेळ केला तर काय... कोण होणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन?

भारत आणि पाकिस्तान दोघेही संपूर्ण साखळी फेरीत अपराजित राहिले आहेत. भारत आणि पाकिस्तान हे दोघेही सुरूवातीला एकाच गटात होते. भारताने तैवानला 18 - 0 असे पराभूत केले. जपानचाही 3 - 1 ने पराभव केला. त्यानंतर भारत - पाकिस्तान सामना 1 - 1 असा बरोबरीत राहिला. भारताने थायलंडचा 17 - 0 असा पराभव केला. आता भारत आणि पाकिस्तान हे फायनलमध्ये एकमेकांना भिडणार आहेत.

India Vs Pakistan Asia Cup
Wrestler Protest Rakesh Tikait : आता कुस्तीपटूंचा एल्गार कुरूक्षेत्रमधून; खाप प्रतिनिधी थेट राष्ट्रपतींनाच भेटणार

सामना कधी होणार आहे?

- भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 1 जूनला होणार आहे.

सामन्याची वेळ काय आहे?

- हा सामना आज (1 जून) रात्री 9.30 ला सुरू होणार आहे.

सामना कोठे खेळवण्यात येणार आहे?

- भारत - पाकिस्तान यांच्यातील फायनल ओमानमध्ये खेळवली जाणार आहे.

भारतात सामना कोणत्या चॅनलवर दिसणार?

- भारत - पाकिस्तान सामन्याचे टीव्हीवर प्रेक्षपण होणार नाहीये.

हा सामना ऑनलाईन कोठे पहायचा?

- भारत पाकिस्तान अंतिम सामना watch.hockey ऑनलाईन पाहता येणार होता.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com