

Davinder Singh Garcha
Sakal
भारतीय क्रीडा विश्वातून दु:खद बातमी समोर आली आहे. भारताचे माजी हॉकीपटू दविंदर सिंह गरचा यांचे शनिवारी (१० जानेवारी) निधन झाले आहे. ते भारताचे ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते राहिले आहेत. ते ७३ वर्षांचे होते. त्यांनी शनिवारी जलंधरमध्ये त्याच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.