50 injured after car rams crowd during Liverpool's victory parade इंग्लिश प्रीमिअऱ लीगचे ( EPL) जेतेपद यंदा लिव्हरपूर फुटबॉल क्लबने पटकावले. सोमवारी शहरात प्रीमियर लीग जेतेपदाचा आनंद साजरा करण्यासाठी लिव्हरपूल क्लबचे हजारो चाहते जमले होते. पण, या मोठ्या गर्दीत अचानक कार घुसली अन् अपघातात किमान ५० जण जखमी झाले आणि २७ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ५३ वर्षीय ब्रिटीश चालकाला अटक करण्यात आली आहे. या घटनेशी दहशवादी हल्ल्याचा कोणताही संबंध नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले.