esakal | T20 World Cup: इशान किशनची संघात निवड; 'या' हॉट मॉडेलची रंगली चर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

इशान किशनची 'टीम इंडिया'त निवड; 'या' हॉट मॉडेलची रंगली चर्चा

इशान किशनची 'टीम इंडिया'त निवड; 'या' हॉट मॉडेलची रंगली चर्चा

sakal_logo
By
विराज भागवत

मुंबई इंडियन्सची फायनल मॅच पाहण्यासाठीही स्टेडियममध्ये होती हजर

T20 World Cup 2021: या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी भारताचा १५ खेळाडूंचा संघ (Team India Squad) बुधवारी जाहीर झाला. भारतीय संघात विराट कोहलीला कर्णधार (Captain Virat Kohli) तर रोहित शर्माला उपकर्णधारपद (Vice Captain Rohit Sharma) देण्यात आले. त्यासोबतच सूर्यकुमार यादव आणि इशान किशन या दोघांनाही संघात स्थान मिळाले. इशान किशनने गेल्या काही महिन्यांमध्ये भारतीय संघाकडून खेळताना दमदार कामगिरी केली. त्याचे फळ त्याला मिळाले. पण, इशानची संघात निवड झाल्यानंतर एका हॉट मॉडेलची जोरदार चर्चा रंगली.

नक्की काय आहे प्रकरण?

इशान किशनने IPLच्या एका सामन्यात दमदार खेळी केली होती. पण त्याच्या संघाला पराभव पत्करावा लागला. त्यानंतर एका मॉडेलने इशान किशनला 'बेबी' असं संबोधलं होतं. तसेच. त्याच्या खेळीचा स्क्रीनशॉटही इन्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत, 'बेबी, मला तुझा अभिमान वाटतो', असं लिहिलं होतं. तेव्हापासून ही मॉडेल आणि इशान किशन या दोघांचे अफेअर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता इशानची टी२० विश्वचषक स्पर्धेत निवड झाल्यानंतर पुन्हा एकदा ही मॉडेल चर्चेचा विषय ठरली असून नेटकरी आता तिच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहेत.

कोण आहे ही मॉडेल?

इशान किशनशी अफेयरच्या चर्चा असलेल्या या मॉडेलचं नाव आदिती हुंडिया. आदिती आणि इशान हे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा गेले २-३ वर्षांपासून सुरू आहे. आदिती आणि इशानचे अनेक फोटो बरेचदा व्हायरल झाले आहेत. मुंबई आणि चेन्नई यांच्यातील IPL 2019मध्ये झालेल्या फायनलसाठी आदिती हजर होती. आदिती ही राजस्थानची आहे. ती मॉडेल-अभिनेत्री आहे. आतापर्यंत तिने काही म्युझिक व्हिडीओ आणि जाहिरातींमध्ये काम केले आहे. २०१८ मध्ये झालेल्या 'मिस सुपरनॅचरल इंडिया' या स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्यापासून ती चर्चेत आली. त्यानंतर इशान किशनसोबतच्या काही फोटोंमुळे त्यांच्या अफेयरच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत.

loading image
go to top