मी फक्त संघासाठी खेळत नाही, तर... : रोहित शर्मा

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

रोहितच्या या सूचक वक्तव्यावरून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. कोहलीने वेस्ट इंडीजला रवाना होण्यापूर्वी संघात सर्व व्यवस्थित असल्याचे म्हटले होते. या सर्व वादावर रोहितने आतापर्यंत कोणतही वक्तव्य केले नव्हते. बुधवारी त्याने ट्विटरवर एक पोस्ट टाकून स्वतःचे मत व्यक्त केले आहे.

मुंबई : विश्वकरंडकानंतर कर्णधार विराट कोहली आणि सलामीवीर रोहित शर्मा यांच्यातील वादाची चर्चा होत असतानाच, रोहितने ट्विट करत मी केवळ संघासाठी नाही तर देशासाठी मैदानात उतरतो असे म्हटले आहे.

रोहितच्या या सूचक वक्तव्यावरून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. कोहलीने वेस्ट इंडीजला रवाना होण्यापूर्वी संघात सर्व व्यवस्थित असल्याचे म्हटले होते. या सर्व वादावर रोहितने आतापर्यंत कोणतही वक्तव्य केले नव्हते. बुधवारी त्याने ट्विटरवर एक पोस्ट टाकून स्वतःचे मत व्यक्त केले आहे.

रोहितने म्हटले आहे की, मी केवळ संघासाठी नाही तर देशासाठी मैदानात उतरतो. वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या ट्वेंटी- 20 मालिकेसाठी भारतीय संघ अमेरिकेत दाखल झाला आहे. भारतीय संघाचा विश्वकरंडकानंतरचा हा पहिलाच दौरा आहे. विश्वकरंडकातील भारताच्या पराभवानंतर रोहित आणि विराट यांच्यात वादाला सुरुवात झाली होती. तसेच रोहितने विराटची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला इंन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्यानंतर चर्चा सुरु झाल्या होत्या. वेस्टइंडीजविरुद्ध भारतीय संघ तीन टी -20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I dont just walk out for my Team I walk out for my country says Rohit Sharma