T20 World Cup : भारत-पाक सामन्यात 'हे' असणार अंपायर? फक्त एकाच भारतीयाला संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

icc announces 16 umpire panel for t20 world cup known nitin menon only indian cricket news

T20 World Cup : भारत-पाक सामन्यात 'हे' असणार अंपायर? फक्त एकाच भारतीयाला संधी

T20 World Cup : टी-20 विश्वचषकसाठी अवघे काही दिवस बाकी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने विश्वचषकसाठी सर्व पंचांची घोषणा केली आहे. मॅच रेफरी आणि पंचांसह एकूण 20 अधिकार्‍यांची निवड करण्यात आली आह, त्यात 16 पंच आणि 4 मॅच रेफरी यांचा समावेश आहे. पंचांमध्ये भारतातील नितीन मेनन यांचा समावेश करण्यात आला आहे. जे आयसीसीच्या एलिट पॅनेलचा भाग आहेत

हेही वाचा: Pant-Urvashi : भांडण मिटलं? उर्वशीने फ्लाइंग KISS देत केलं पंतला बर्थडे विश

आयसीसीने स्पर्धेच्या पहिल्या फेरीसाठी आणि सुपर 12 टप्प्यासाठी 20 मॅच अधिकाऱ्यांची घोषणा केली आहे. आयसीसीने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, एकूण 16 पंच या स्पर्धेत काम पाहणार आहे, ज्यात रिचर्ड केटलबरो, नितीन मेनन, कुमारा धर्मसेना आणि मरायस इरास्मस यांचा समावेश आहे. जे 2021 च्या अंतिम सामन्याचे पंच होते.

हेही वाचा: Photo Viral : रोहित शर्माला आसाम पोलिसांकडून अटक? सोशल मीडियावर चर्चा

टी-20 विश्वचषक मध्ये भारत-पाकिस्तान 23 ऑक्टोबरला आमनेसामने येणार आहे. या हाय व्होल्टेज सामन्यासाठी रॉड टकर आणि मराइस इरास्मस हे मैदानावरील पंच असतील.

मॅच रेफरी : अँड्र्यू पायक्रॉफ्ट, क्रिस्टोफर ब्रॉड, डेव्हिड बून आणि रंजन मदुगले

पंच : एड्रियन होल्डस्टॉक, अलीम दार, अहसान रझा, क्रिस्टोफर ब्राउन, क्रिस्टोफर गफानी, जोएल विल्सन, कुमारा धर्मसेना, लँगटन रस्सेरे, मराइस इरास्मस, मायकेल गॉफ, नितीन मेनन, पॉल रीफेल, पॉल विल्सन, रिचर्ड इलिंगवर्थ, रिचर्ड केटलबोरो, रिचर्ड केटलबोरो.