कॅप्टन वेळचं भान विसरला तर गोलंदाजाला फटके, ICC चा नवा नियम

ICC announces new playing conditions for T20Is
ICC announces new playing conditions for T20Is Sakal
Updated on
Summary

जर एखादा संघ निर्धारित वेळेत शेवटच्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यास सज्ज नसेल तर...

आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यातील Slow Over Rate साठी नवा नियम लागू करण्यात आला आहे. या नव्या नियमाचा अखेरच्या षटकात फलंदाजांना अधिक फायदा मिळेल. आयसीसीने International Cricket Council (ICC) नव्या नियमात झालेले बदलाची माहिती दिली आहे. सध्याच्या घडीला षटकांची गती कमी राखल्यासाठी जो नियम आहे त्यात काही बदल करण्यात आला आहे. जर एखादा संघ निर्धारित वेळेत षटके पूर्ण करु शकला नाही तर शेवटच्या षटकात संघाला फिल्डिंगमध्ये बदल करावा लागेल. त्याचा फायदा थेट फलंदाजाला होईल. (ICC announces new playing conditions for T20Is)

एखादा संघ निर्धारित वेळेत षटक पूर्ण करु शकला नाही तर त्या संघाला फिल्डिंगमध्ये बदल करावा लागेल. पुरुष आणि महिला दोन्ही गटातील आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात हा नियम लागू असेल. सबिना पार्कवर वेस्ट इंडीज आणि आयर्लंड यांच्यात रंगणाऱ्या सामन्यापासून या नियमाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

ICC announces new playing conditions for T20Is
पंत शॉट सिलेक्शनमध्ये पुन्हा चुकला; द्रविड गुरुजी घेणार शाळा!

काय आहे आयसीसीचा नवा नियम?

जर एखाद्या संघातील गोलंदाज निर्धारित वेळेत शेवटच्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यास सज्ज नसेल तर उर्वरित षटकासाठी फिल्डिंगमध्ये बदल करावा लागेल. याचा फायदा फलंदाजांना होईल. कारण नव्या नियमानुसार, Slow Over Rate मुळे संघाला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असलेल्या खेळाडू आत बोलवावा लागेल. सध्याच्या घडीला पावर प्लेची षटके वगळता अन्य षटकात 5 फिल्डर सर्कल बाहेर असतात. पण आता टी-20 मध्ये स्लो ओव्हर रेटनं गोलंदाजी केल्यास अखेरच्या षटकात संघाला मोठा दणका बसणार आहे. याशिवाय अडीच मिनिटांच्या ड्रिंक्स ब्रेकचा निर्णय घेण्याचा अधिकार हा टीमला देण्यात आला आहे. त्यांच्या मर्जीनुसार ते ड्रिंक्स ब्रेक घेऊ शकतील.

ICC announces new playing conditions for T20Is
VIDEO : नंबर वन बॉलरला मार्क वूडचा कडक सिक्सर, गिलस्पीही फिदा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com