चौकारांवरुन विजयाच्या नियमावर ICC करणार कुंबळेंशी चर्चा

वृत्तसंस्था
सोमवार, 29 जुलै 2019

भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळे यांच्या अध्यक्षतेखालील आयसीसीची क्रिकेट समिती विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्याशी संलग्न विषयांवर चर्चा करणार आहे. यात चौकारांची संख्येवरून विजेता घोषित करण्याच्या नियमाचा समावेश आहे.

लंडन : भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळे यांच्या अध्यक्षतेखालील आयसीसीची क्रिकेट समिती विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्याशी संलग्न विषयांवर चर्चा करणार आहे. यात चौकारांची संख्येवरून विजेता घोषित करण्याच्या नियमाचा समावेश आहे.

आयसीसीचे क्रिकेट व्यवस्थापक जिऑफ एलर्डाइस यांनी ही माहिती दिली. सामन्यात अधिक चौकार मारल्यामुळे विश्‍वकरंडक स्पर्धेत इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले होते. क्रिकेट विश्‍वात खेळल्या जाणाऱ्या टी 20 लीगमध्ये याच नियमाचा उपयोग केला जातो.

त्यामुळेच विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आम्ही या नियमाचा उपयोग केला. अशा अडचणीच्या स्थितीत काही वेगळी पद्धत वापरता येईल का ? याचा विचार आता ही समिती करणार आहे, असेही एलर्डाइस यानी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ICC to discuss rule used in world cup 2019 final with Anil Kumble