ICC Ranking : पंतची मोठी उसळी, विराटची सुधारणा तर रोहितची घसरण

ICC Mens Test Player Rankings Rishabh Pant Reached on 14th Spot
ICC Mens Test Player Rankings Rishabh Pant Reached on 14th SpotEsakal

दुबई : दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील कसोटी मालिकेतनंतर आयसीसी मेन्स टेस्ट रँकिंगमध्ये (ICC Mens Test Player Rankings) काही बदल झाले आहेत. याचदरम्यान इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अ‍ॅशेस मालिका (Ashes Series) सुरू होती. त्यामुळे मालिकेत दमदार फलंदाजी करणारा ट्रॅव्हिस हेडने (Travis Head) आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये चांगलीच उसळी घेतली. तो कारकिर्दित पहिल्यांदाच पाचव्या स्थानावर पोहचला आहे. तो आधी दहाव्या स्थानावर होता. याचबरोबर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात शतक ठोकणाऱ्या ऋषभ पंतने (Rishabh Pant) 10 स्थानांची उसळी घेतली. (ICC Mens Test Player Rankings Rishabh Pant Reached on 14th Spot)

ICC Mens Test Player Rankings Rishabh Pant Reached on 14th Spot
'टूटा है गाबा का घमंड...' तो क्षण अविस्मरणीयच!

भारताचा माजी कसोटी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) जरी शतकांच्या दुष्काळातून जात असला तरी त्याने आपल्या रँकिंगमध्ये सुधारणा केली आहे. आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत 79 आणि 29 धावांची खेळी केली. त्यानंतर त्याच्या कसोटी रँकिंगमध्ये (ICC Test Ranking) दोन अंकाची सुधारणा झाली. तो आता सातव्या स्थानावर आहे. याच सामन्यात दुसऱ्या डावात शतक ठोकणारा ऋषभ पंतही फायद्यात आला आहे. त्याने आयसीसी पुरूष कसोटी क्रमवारीमध्ये 10 स्थानांची उसळी घेत 14 वे स्थान पटकावले आहे. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) देखील टॉप टेनमध्ये परतला आहे.

ICC Mens Test Player Rankings Rishabh Pant Reached on 14th Spot
आज गांगुली, द्रविड असतील विराटच्या रडारवर

दरम्यान, दक्षिण आफ्रिका दौऱ्यालाच मुकणाऱ्या रोहित शर्माची (Rohit Sharma) आयसीसी कसोटी रँकिंगमध्ये घसरण झाली आहे. तो यापूर्वी कसोटी रँकिंगमध्ये पाचव्या स्थानावर होता. मात्र ते स्थान आता ट्रॅविस हेडने पटकावले असून रोहित शर्मा सहाव्या स्थानावर घसरला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com