आज गांगुली, द्रविड असतील विराटच्या रडारवर | Virat Kohli eye on breaking sourav ganguly rahul dravid records | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli eye on Breaking Sourav Ganguly Rahul Dravid Records
आज गांगुली, द्रविड असतील विराटच्या रडारवर

आज गांगुली, द्रविड असतील विराटच्या रडारवर

पार्ल : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील एकदिवसीय मालिकेची सुरुवात आजपासून (दि. 19) होत आहे. कर्णधारपदाचे सर्व मुकूट खाली ठेवलेल्या विराट कोहलीवर (Virat Kohli) सर्वांची नजर असणार आहे. त्याच्या बॅटमधून शतक निघेल अशी आशा त्याचे चाहत्यांना असणार आहे. जर विराट कोहलीने आजच्या सामन्यात मोठी खेळी केली तर तो फक्त शतकांचा दुष्काळ संपवणार नाही तर अनेक विक्रमही तो या एका खेळीने मागे टाकणार आहे. त्याने जर आज फक्त 27 धावा जरी केल्या तरी तो सौरभ गांगुली आणि राहुल द्रविड यांना मागे टाकणार आहे. (Virat Kohli eye on Breaking Sourav Ganguly Rahul Dravid Records)

हेही वाचा: LLC T20 : विरेंद्र सेहवाग इंडियन महाराजा टीमचा असणार कर्णधार

रिकी पॉटिंगच्या विक्रमाशी बरोबरी

दोन वर्षापूर्वी विराट कोहलीच्या बॅटमधून शतक आले होते. त्यानंतर त्याला अजून शतकी खेळी करता आलेली नाही. मात्र आज जर विराट कोहलीने शतक ठोकले तर तो रिकी पॉटिंगच्या (Ricky Ponting) 71 आंतरराष्ट्रीय शतकांची बरोबरी करेल. कोहलीची आता 70 शतके झाली आहेत. जर आज विराट शतक साजरे झाले तर किंग कोहली सर्वाधिक शतके करणाऱ्यांच्या यादीत पॉटिंगबरोबर संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानावर विराजमान होणार आहे.

सचिन तेंडुलकर, क्विंटन डिकॉक क्लबमध्ये होईल सामिल

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळलेल्या सामन्यात सर्वाधित शतक झळकावण्याचा विक्रम एबी डिव्हिलियर्सच्या नावावर आहे. त्याने भारताविरुद्ध 6 शतके झळकावली आहेत. यानंतर सचिन तेंडुलकर (AB de Villiers) आणि क्विंटन डिकॉकचा नंबर लागतो. या दोघांनी प्रत्येकी पाच शतके ठोकली आहेत. जर विराट कोहलीने आजच्या सामन्यात शतक ठोकले तर तो सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि क्विंटन डिकॉकच्या (Quinton de Kock) पंगतीत जाऊन बसेल. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आतापर्यंत 4 शतके ठोकली आहेत.

हेही वाचा: कसोटी कॅप्टन्सी बाबत राहुल नाही नाही म्हणत बोललाच

गांगुली, द्रविड असतील विराटच्या निशाण्यावर

एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताकडून सचिन तेंडुलकरने सर्वाधिक 2001 धावा केल्या आहेत. त्या खालोखाल सौरभ गांगुली (Sourav Ganguly) आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचा नंबर लागतो. गांगुलीने 1313 धावा केल्या आहेत तर द्रविडने 1309 धावा केल्या आहेत. विराट कोहली यांच्या फार मागे नाही. त्याने आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात 1287 धावा केल्या आहेत. आज तर त्याने 27 धावा केल्या तर तो गांगुली आणि द्रविडला मागे टाकत आफ्रिकेविरुद्ध भारताकडून सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज होईल.

याचबरोबर एकदिवसीय क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक धावा करण्यात सचिन तेंडुलकर आघाडीवर आहे. त्याने 1453 धावा केल्या आहेत. त्यानंतर रिकी पॉटिंगचे नाव येते. तो 1423 धावा करुन दुसऱ्या स्थानावर आहे. तर सौरभ गांगुली 1048 धावा करुन दुसऱ्या तर राहुल द्रविड 930 धावा करुन तिसऱ्या स्थानावर आहे. विराटने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दक्षिण आफ्रिकेत आतापर्यंत 887 धावा केल्या आहेत. जर आजपासून सुरु होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत त्याने 162 धावा केल्या तर तो गांगुली आणि द्रविडला मागे टाकत तिसऱ्या स्थानावर पोहचेल.

हेही वाचा: IPLने नाकारलेला उन्मुक्त चंद BBL खेळणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू

विराटने 113 धावा केल्या तर काय होईल?

आज जर विराट कोहलीच्या बॅटमधून शतक आले तर तो त्याचे कारकिर्दितील 71 वे शतक ठरेल. जर विराटने 113 धावा केल्या तर तो आफ्रिकेविरुद्ध आफ्रिकेत 1 हजार धावा पूर्ण करेल. याचबरोबर एकदिवसीय सामन्यात चार देशात हजारपेक्षा जास्त धावा करणारा तो तिसरा फलंदाज ठरणार आहे. कोहलीने भारतामध्ये 4 हजार 994 धावा, इंग्लंडमध्ये 1316 आणि ऑस्ट्रेलियामध्ये 1327 धावा केल्या आहेत.

या यादीत राहुल द्रविड, एमएस धोनी (MS Dhoni) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी तीन देशात हजारच्या पुढे धावा केल्या आहेत. तर सौरभ गांगुलीने देखील 4 देशांविरुद्ध एक हजार धावा केल्या आहेत.

Web Title: 1st Odi Against South Africa Virat Kohli Eye On Breaking Sourav Ganguly Rahul Dravid Records

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top