ICC Rule : आयसीसीने बदलले क्रिकेटचे 'हे' नियम! क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची झाली गोची; जाणून घ्या नियम

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) गेल्या महिन्यात खेळाच्या नियमांमध्ये काही मोठे बदल केले होते परंतु....
ICC modifies rule surrounding caught-behind check during stumping referrals cricket news in marathi
ICC modifies rule surrounding caught-behind check during stumping referrals cricket news in marathi SAKAL

ICC modifies Rule : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) गेल्या महिन्यात खेळाच्या नियमांमध्ये काही मोठे बदल केले होते. परंतु त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती. तरी हे सर्व नियम 2024 च्या नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून लागू झाले आहेत.

हे सर्व नियम 3 जानेवारीपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सोबत ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात खेळल्या जाणार्‍या कसोटी सामन्यातही लागू झाले आहेत. त्यामुळे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची गोची झाली. या नियमांमधील बदलांबद्दल बर्‍याच काळापासून अनेक आजी-माजी खेळाडू बोलत होते. त्यानंतर आता आयसीसीने ते बदल लागू केले आहेत.

ICC modifies rule surrounding caught-behind check during stumping referrals cricket news in marathi
T20 World Cup 2024 Schedule : टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा पहिला सामना आयर्लंडशी! तर 'या' दिवशी पाकिस्तानशी रंगणार थरार?

स्टंपिंग अपीलवर यापुढे कॉट-बिहाइंड तपासले जाणार नाही....

हा एक असा नियम होता, ज्यामुळे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला अनेकदा डीआरएस वाचवण्याच्या प्रयत्नात सामन्यादरम्यान त्याचा फायदा घेतला. या आधीच्या नियमात, एखाद्या संघाने क्षेत्ररक्षण करताना फलंदाजाविरुद्ध स्टंपिंगसाठी अपील केले, तर प्रकरण तिसऱ्या पंचाकडे जायचे. त्यावेळी स्टंपिंग व्यतिरिक्त कॉट-बिहाइंड देखील तपासले जात होते. ज्यासाठी यापूर्वी अनेक वेळा क्रिकेट खेळाडू आक्षेपही घेतला होता.

क्रिकबझच्या वृत्तानुसार, आता आयसीसीच्या नवीन नियमानुसार, जर कोणत्याही संघाने स्टंपिंगबाबत अपील केले, तर ते थर्ड अंपायरकडे जाईल, तेव्हा ते साइड-ऑन रिप्ले पाहूनच ते तपासतील. याशिवाय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला झेलबाद होण्याचे आपील करायची असल्यास त्यांना पुन्हा डीआरएस घ्यावे लागेल.

ICC modifies rule surrounding caught-behind check during stumping referrals cricket news in marathi
Surya Kumar Yadav : सूर्या सलग दुसऱ्या वर्षी होणार टी 20 क्रिकेटर ऑफ द इयर...? स्पर्धेत झिम्बाब्वे, युगांडाचे खेळाडू

या नियमांमध्ये केलेले बदल

याशिवाय, ICC ने आता मैदानावरील दुखापतीच्या वेळीवर मर्यादा देखील निश्चित केली आहे, ज्यामध्ये मैदानावर खेळाडूला दुखापत झाल्यास, खेळ फक्त 4 मिनिटांसाठी थांबला जाईल. याशिवाय आता तिसऱ्या पंचाला फ्रंट फूट वगळता सर्व प्रकारचे नो-बॉल तपासण्याचे अधिकार असतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com