ICC Women ODI Rankings : स्मृती मानधनाची उडी; मिताली राज जैसे थे!

Smriti Mandhana
Smriti MandhanaSakal

भारतीय बॅटर स्मृती मानधनाने वनडे रँकिंगमध्ये सुधारणा केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) नुकतीच नवी क्रमवारी जाहीर केली. यात स्मृती मानधना पहिल्या पाचमध्ये पोहचली आहे. भारताची दिग्गज बॅटर आणि वनडे संघाची कर्णधार मिताली राज हिने आपले दुसरे स्थान कायम राखले आहे. याआधी स्मृती मानधनाने 2021 या वर्षातील महिला क्रिकेटमधील सर्वोत्तम पुरस्कार पटकवला होता.

स्मृती मानधनाच्या रँकिंग किती स्थानांनी सुधारलं

स्मृती मानधनाने (Smriti Mandhana) आपल्या क्रमवारीत दोन स्थानांनी सुधारणा करत पाचव्या स्थानावर मजल मारली आहे. तिच्या खात्यात 710 रेटिंग पॉइंट आहेत. भारतीय संघाची कर्णधार मिताली राज (Mithali Raj)738 पॉइंट्ससह दुसऱ्या स्थानावर कायम आहे. ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात करणारी एलिसा हीली 742 पॉइंट्ससह अव्वल स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाची बेथ मूनी तिसऱ्या आणि एमी सँटरथवेट चौथ्या स्थानावर आहे.

Smriti Mandhana
व्वा! Max Parrot यानं कॅन्सरवर मात करत जिंकलं Olympic गोल्ड

गोलंदाजीमध्ये झुलन गोस्वामी दुसऱ्या स्थानावर

महिला वनडेत गोलंदाजीत ऑस्ट्रेलियाचा दबदबा आहे. जेस जोनासेन ही 773 गुणांसह अव्वलस्थानी आहे. तिच्या पाठोपाठ या क्रमवारीत झुलन गोस्वामी दुसऱ्या स्थानावर आहे. अनुभवी भारतीय गोलंदाज झुलनच्या खात्यात 727 पॉइंट्स आहेत.

Smriti Mandhana
व्वा! Max Parrot यानं कॅन्सरवर मात करत जिंकलं Olympic गोल्ड

अष्टपैलू महिला खेळाडूंच्या यादीत एलिसे पेरी अव्व्ल स्थानावर आहे. पेरीने नुकत्याच झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात लक्षवेधी कामगिरी केली होती. तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या वनडेत तिने 40 धावांची खेळी केली होती. याशिवाय तीन विकेट्सही घेतल्या होत्या. या कामगिरीमुळे तिला 47 रेटिंगचा फायदा झाला आहे. पेरीनं इंग्लंडच्या नेटली स्किव्हरला मागे टाकत अव्वलस्थान पटकावले आहे. भारताची दीप्ती शर्मा चौथ्या स्थानावर असून झुलन गोस्वामी या क्रमवारीत दहाव्या स्थानावर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com