World Cup 2023 India Vs Pakistan : शाहबाज सरकारचा मोठा निर्णय; पाकिस्तान वर्ल्डकप खेळणार नाही?

World Cup 2023 India Vs Pakistan
World Cup 2023 India Vs Pakistanesakal

World Cup 2023 India Vs Pakistan : पाकिस्तानचा संघ भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपमध्ये खेळायला येणार नाही नाही याबाबतचा निर्णय पाकिस्तान सरकार घेणार आहे. आधी भारतातील मैदानावरील सुरक्षेचा आढावा घेणार असं म्हणणाऱ्या पाकिस्तान सरकारनं आता मोठा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारतात होणाऱ्या वर्ल्डकपसाठी पाकिस्तानचा संघ पाठवायचा की नाही याचा निर्णय घेण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. ही समिती सर्व बाबींवर चर्चा करून आपला अहवाल शरीफ यांच्याकडे सोपवणार आहेत.

MS Dhoni: काय सांगता धोनीने इन्स्टावर VIDEO केला शेअर... चाहत्यांसोबत नाही तर लाडक्या श्वानांसोबत सेलीब्रेशन

पाकिस्तान भारतात येणार?

पाकिस्तानचे पंतप्रधान हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे संरक्षक देखील असतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आणि बीसीसीआय यांनी यापूर्वीच वर्ल्डकपचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यांना आशा आहे की पाकिस्तान 5 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेसाठी भारतात येईल. मात्र पीसीबीने दोन्ही देशांमध्ये असलेल्या तणावपूर्ण संबंधामुळे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सरकारची परवानगी लागेल असे सांगितले.

World Cup 2023 India Vs Pakistan
Ashes Series Steve Smith : जाता जाता बेअरस्टोने हाणला टोला, पलटावर करत स्मिथ म्हणाला...

पाकिस्तानची उच्चस्तरीय समिती

पाकिस्तानने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीत क्रीडामंत्री अहसान मजारी, मरियम औरंगजेब, असद महमूद, अमीन उल हक, कमर जमानकैरा आणि तारिक फातमी यांचा समावेश आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे काळजीवाहू अध्यक्ष जका अशरफ आणि सीईओ सलमान तासीर हे डर्बन येथे होणाऱ्या आयसीसीच्या बेठकीत सहभागी होण्यासाठी जाणार आहेत.

या बैठकीत सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानचा संघ भारतात पाठवण्यास नकार देण्याबाबचा मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामना हा 15 ऑक्टोबरला अहमदाबाद येथे होणार आहे.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com