ICC World Cup 2027 : शिक्कामोर्तब! क्रिकेटच्या महाकुंभाचा बिगुल वाजला; 'या' आठ ठिकाणी रंगणार वर्ल्ड कपचा थरार

दक्षिण आफ्रिकेत २०२७मधील एकदिवसीय विश्‍वकरंडकाचे आयोजन करण्यात येणार असून या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील स्थळांवर यजमान मंडळाकडून बुधवारी शिक्कामोर्तब करण्यात आले.
ICC World Cup 2027 News Marathi
ICC World Cup 2027 News Marathisakal

ICC World Cup 2027 : दक्षिण आफ्रिकेत २०२७मधील एकदिवसीय विश्‍वकरंडकाचे आयोजन करण्यात येणार असून या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील स्थळांवर यजमान मंडळाकडून बुधवारी शिक्कामोर्तब करण्यात आले. जोहान्सबर्गमधील वंडरर्स, डर्बनमधील किंग्समीड, केपटाऊनमधील न्यूलँडस्‌ यासह एकूण आठ ठिकाणी या स्पर्धेच्या लढतींची रंगत पाहायला मिळणार आहे.

ICC World Cup 2027 News Marathi
RR vs GT : राशिद अन् राहुल! दोन RR अन् 2 षटकात बाजी पलटली, सामन्याचा हिरोच ठरला व्हिलन?

दक्षिण आफ्रिकन क्रिकेट मंडळाचे विशेष कार्यकारी अधिकारी फोलेत्सी मोसेकी यांच्याकडून सांगण्यात आले की, आयसीसीकडून आम्हाला ११ स्थळांचे प्रमाणपत्र मिळालेले आहे; पण हॉटेल रूम व विमानतळावर लक्ष देता तीन स्थळांवर लढती न खेळवण्याचा निर्णय आमच्याकडून घेण्यात आला आहे. बेनोनी, जेबी मार्कस ओव्हल व डायमंड ओव्हल या तीन ठिकाणी सामने होणार नाहीत. वंडरर्स, किंग्समीड, न्यूलँडस्‌, सेंच्युरियन पार्क, सेंट जॉर्ज पार्क, बोलंड पार्क, ब्लोमंफाँटेन, बफेलो पार्क या आठ स्थळांना लढतींसाठी निश्‍चित करण्यात आले आहे.

ICC World Cup 2027 News Marathi
IPL 2024 RR vs GT : शेवटच्या दोन षटकात खेळ पलटला; राशिद खान अन् राहुल तेवतियानं राजस्थान दिली मात

नामिबियाकडे यजमानपद, पण...

२०२७मधील एकदिवसीय विश्‍वकरंडक तीन देशांमध्ये खेळवण्यात येणार आहे. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे व नामिबिया या तीन देशांमध्ये या स्पर्धेच्या लढती पार पडतील; पण दक्षिण आफ्रिका व झिम्बाब्वे या दोन देशांना मुख्य फेरीत थेट पात्रता देण्यात आली आहे. नामिबियाला मात्र पात्रता फेरीमधून जावे लागणार आहे. नामिबियाला पात्रता फेरीत अपयश आल्यास त्यांना विश्‍वकरंडकात सहभागी होता येणार नाही.

ICC World Cup 2027 News Marathi
RR vs GT IPL 2024 : एका वाईड बॉलवरून सामन्यात झाला राडा! थर्ड अंपायरने अचानक मारली पलटी

स्पर्धेचे स्वरूप

  • - १४ देशांचा सहभाग

  • - आठ देश आयसीसी क्रमवारीनुसार थेट पात्र

  • - दोन यजमान देशही थेट पात्र (नामिबिया वगळता)

  • - प्रत्येकी सात देशांचे दोन गट

  • - सर्वोत्तम तीन संघ सुपरसिक्स फेरीसाठी पात्र ठरणार

  • - उपांत्य फेरी व अंतिम फेरीच्या लढती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com