ICC Questions PCB Over Force Majeure Claim
esakal
टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारताविरुद्धच्या सामन्यात न खेळण्यासाठी पाकिस्तानने ‘फोर्स मॅज्योर’ (आपत्कालीन परिस्थिती) या करारातील नियमाचा आधार घेतला; परंतु हा नियम तुम्हाला कसा काय लागू होऊ शकतो, हे सिद्ध करा, अशी स्पष्ट विचारणा आयसीसीने पाक मंडळाकडे केली आहे. या विश्वकरंडक स्पर्धेत केवळ एकच सामन्यातून तुम्ही कशी माघार घेऊ शकतो, याचे स्पष्टीकरण देण्याची सूचना आयसीसीने पाक मंडळाला केली आहे.